Bigg Boss 15 : शॉकिंग एलिमिनेशन! सिम्बा नागपालनंतर जय भानुशाली आऊट?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 03:03 PM2021-11-25T15:03:26+5:302021-11-25T15:04:01+5:30

Bigg Boss 15 : ‘बिग बॉस 15’ सध्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. एकीकडे बिग बॉसच्या घरातील वाईल्ड कार्ड एन्ट्रींची चर्चा आहे, दुसरीकडे शॉकिंग एलिमिनेशनची चर्चा आहे.

The Khabri tweeted Jay Bhanushali is eliminated from the Bigg Boss 15 House after Simba Nagpal gets evicted | Bigg Boss 15 : शॉकिंग एलिमिनेशन! सिम्बा नागपालनंतर जय भानुशाली आऊट?

Bigg Boss 15 : शॉकिंग एलिमिनेशन! सिम्बा नागपालनंतर जय भानुशाली आऊट?

Next

बिग बॉस 15’ (Bigg Boss 15 ) सध्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. एकीकडे बिग बॉसच्या घरातील वाईल्ड कार्ड एन्ट्रींची चर्चा आहे, दुसरीकडे शॉकिंग एलिमिनेशन्समुळे चाहते हैराण आहेत. होय, सिम्बा नागपालनंतर आता जय भानुशाली ( Jay Bhanushali) बिग बॉस 15 मधून बाद झाल्याचं कळतंय.
बिग बॉसच्या घरातील बित्तंमबातमी देणा-या ‘द खबरी’ने याबाबत ट्वीट केलं आहे. जय भानुशाली शोमधून आऊट झाल्याचं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. अर्थात कन्फर्मेशनची प्रतीक्षा आहे.

वीकेंड का वार एपिसोडेमध्ये सलमानने आता शोमध्ये केवळ टॉप 5 सर्वात मजबूत स्पर्धकचं राहणार, बाकी बाहेर जाणार, अशी घोषणा केली होती. जय भानुशाली, राजीव अदातिया, सिम्बा नागाल, उमर रियाज, नेहा भसीन, विशाल कोटियन बॉटम 6 मध्ये होते. यापैकी सिम्बा हा बाहेर पडला आणि पाठोपाठ जय सुद्धा आऊट झाला.
जय भानुशाली ‘बिग बॉस 15’च्या घरातील सर्वात महागड्या स्पर्धकांपैकी एक होता. रिपोर्टनुसार, बिग बॉसच्या घरातील प्रत्येक आठवड्यासाठी त्याला 11 लाख रूपये दिले जात होतं. जय हा टीव्ही व फिल्म इंडस्ट्रीचा लोकप्रिय चेहरा आहे. त्यामुळे मेकर्स व प्रेक्षकांना त्याच्याकडून मोठी अपेक्षा होती. तोच ‘बिग बॉस 15’ चा विजेता होणार, असा अंदाजही बांधला गेला. पण कदाचित जय या कसोटीवर अपयशी ठरला.
वीकेंड का वॉरमध्ये सलमान खान अनेकदा जय भानुशालीला वेगवेगळे सल्ले देताना दिसला होता. घरात येणाºया खास पाहुण्यांनीही जयला वेळोवेळी गेम सुधारण्याचा सल्ला दिला होता. पण याऊपरही जयच्या गेममध्ये फार काही सुधारणा दिसत नव्हती.

घरात पुन्हा येणार भारती व हर्ष
भारती सिंग व हर्ष पुन्हा एकदा बिग बॉस 15 च्शा घरात येणार आहेत. यावेळी बॉटम 5 मधील स्पर्धकांना ते दोघंही एक टास्क देतील. या टास्कमध्ये या स्पर्धकांना काहीतरी करून सर्वांचं लक्ष वेधून घ्यावं लागेल. याबदल्यात त्यांना मतं मिळतील. ज्याच्या पारड्यात कमी मतं पडतील, तो स्पर्धक घरातून आऊट होईल.

Web Title: The Khabri tweeted Jay Bhanushali is eliminated from the Bigg Boss 15 House after Simba Nagpal gets evicted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app