KBC 13 : जॅकी श्रॉफ यांनी अमिताभ बच्चन यांच्याच चित्रपटातून गिरवलेत ‘भिडू’वाल्या भाषेचे धडे, वाचा हा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 05:10 PM2021-09-23T17:10:56+5:302021-09-23T17:12:17+5:30

कौन बनेगा करोडपती १३ मध्ये शुक्रवारच्या भागात जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी पाहुणे म्हणून येणार आहेत.

KBC 13: Jackie Shroff borrows language lessons from Amitabh Bachchan's film 'Bhidu', read this case | KBC 13 : जॅकी श्रॉफ यांनी अमिताभ बच्चन यांच्याच चित्रपटातून गिरवलेत ‘भिडू’वाल्या भाषेचे धडे, वाचा हा किस्सा

KBC 13 : जॅकी श्रॉफ यांनी अमिताभ बच्चन यांच्याच चित्रपटातून गिरवलेत ‘भिडू’वाल्या भाषेचे धडे, वाचा हा किस्सा

Next

सोनी एण्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती १३ मध्ये शुक्रवारच्या भागात जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी पाहुणे म्हणून येणार आहेत. यावेळी जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी यांच्याकडून बरेच किस्से ऐकायला मिळणार आहे. तर या शोमध्ये जॅकी श्रॉफ यांनी भिडूवाल्या भाषा कुठून शिकले, याचा खुलासा केला आहे.

कौन बनेगा करोडपती या शोमध्ये होस्ट अमिताभ बच्चन यांनी जॅकी श्रॉफ यांना विचारले की, त्यांनी ही खास ‘भिडू’ वाली भाषा कुठून शिकली? त्यावर जॅकी श्रॉफ यांनी उत्तर दिले, “सर, मी अशा ठिकाणी राहत होतो की जिथे आजूबाजूला अशीच भाषा बोलले जात असे. माझे कान उघडे होते, पण तोंड बंद होते. त्यामुळे माझ्या कानावर जे पडायचे, त्यातून मी बरेच काही शिकलो. शिवाय तुम्ही होतातच! बहुतांशी चित्रपटात तुम्ही असायचात, आम्ही तर मागून आलो. तुम्हीच आम्हाला ही ‘भिडू’ भाषा दिली आहे. तुम्ही आम्हाला चांगल्या प्रकारे बोलायलाही शिकवली. पण ही मुंबईची भाषा देखील तुम्हीच आम्हाला दिली आहे. अमर अकबर अँथनीमध्ये तुमचा एक डायलॉगसुद्धा होता.”


त्यानंतर अमिताभ बच्चन अमर अकबर अँथनीचा तो डायलॉग या शोमध्ये बोलताना दिसले. अगदी त्याच लहेजात ते म्हणाले की, “वैसे तो आदमी लाइफ में दोइच टाइम भागता है, ऑलिम्पिक का रेस हो या पोलीस का केस हो. तुम किस लिये भागता है, भाई?” हे ऐकून उपस्थित प्रेक्षक आणि पाहुणे कलाकार यांनी टाळ्यांचा गडगडाट करून अमिताभ बच्चन यांना दाद दिली.


बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी ज्या समाजकार्याला समर्थन देतात त्या कार्याला हातभार लावण्यासाठी कौन बनेगा करोडपती खेळताना दिसतील. या खेळात त्यांनी जिंकलेली रक्कम जॅकी थेलेसेमिक इंडियाला तर सुनील शेट्टी विप्ला फाऊंडेशनला दान करणार आहेत.

Web Title: KBC 13: Jackie Shroff borrows language lessons from Amitabh Bachchan's film 'Bhidu', read this case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app