गोविंदाच्या पत्नीच्या कमेंटवर भडकली कश्मीरा शाह, म्हणाली - 'कोण आहे सुनीता?'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 03:45 PM2021-09-11T15:45:26+5:302021-09-11T15:46:53+5:30

कृष्णाची पत्नी आणि अभिनेत्री  कश्मीरा शाह म्हणाली की, 'खरं सांगायचं तर मला या संपूर्ण वादात दोन पैशांचा इंटरेस्ट नाही.

Kashmera Shah on fight between Govinda's wife Sunita and Krushna Abhishek | गोविंदाच्या पत्नीच्या कमेंटवर भडकली कश्मीरा शाह, म्हणाली - 'कोण आहे सुनीता?'

गोविंदाच्या पत्नीच्या कमेंटवर भडकली कश्मीरा शाह, म्हणाली - 'कोण आहे सुनीता?'

Next

The Kapil Sharma Show मध्ये गोविंदा आणि त्याची पत्नी नुकतीच स्पेशल गेस्ट म्हणून आले होते. यावेळी शूटींग दरम्यान गोविंदाचा भाचा कृष्णा गायब होता. अशात सुनीता म्हणजेच गोविंदाची पत्नी कृष्णाबाबत खूपकाही बोलली. सोबतच सुनिता असंही म्हणाली की, ती जोपर्यंत जिवंत असेल हा वाद मिटण्याची काही शक्यता नाही. तेच कृष्णा यावर म्हणाला की, त्याने सगळं काही आता गणपती बाप्पावर सोडलं आहे.

तेच कृष्णाची पत्नी आणि अभिनेत्री  कश्मीरा शाह म्हणाली की, 'खरं सांगायचं तर मला या संपूर्ण वादात दोन पैशांचा इंटरेस्ट नाही. गेल्या ५ वर्षांपासून मला त्या लोकांबाबत काहीच देणं-घेणं नाही. त्यांच्याबाबत मला आता काहीच बोलायचं नाहीये. तुम्हाला माहीत असेल की, बऱ्याच वर्षांपासून मी यावर काहीच बोलले नाही. नाही तर त्यांच्याकडे देण्यासाठी माझ्याकडे सडेतोड उत्तर आहे'.

कश्मीरा पुढे म्हणाली की, सोशल मीडियावर तिला फॅन्सने उत्तर तर दिलं आहेच. ती वाईट प्रकारे ट्रोल होत आहे. ती म्हणाली ना कृष्णा टॅलेंटेड नाही. असं तेच लोक बोलतात ज्यांना टॅलेंटची समज नसते आणि स्वत:ही टॅलेंटेड नसतात. असेच लोक तुमच्याबाबत वाईट बोलत असतात ज्यांनी जगात काही केलेलं नसतं आणि जे स्वत:ला तुमच्यापेक्षा कमी समजतात. जेव्हा आपण अभिनेते होतो तेव्हा तुमचं लाइफ प्रायव्हेट राहत नसतं. ते पब्लित होते. तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी तयार रहावं लागतं. जर तुमच्या नावाने लोक जोक बनवत असतील, तुम्ही जगाला हेच सांगाल की, त्यांच्यामुळे करिअर  बनलं'.

कशामुळे नाराज?

आधी मी त्यांच्या बोलण्याने प्रभावित होत होते. पण जेव्हा ते माझ्या मुलांना बघण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले नाहीत. तेव्हापासून मी त्यांच्यासोबत बोलणं बंद केलं. परिवार तोच असतो जो वाईट काळात तुमच्यासोबत उभा असतो. ते लोक आमच्यासोबत नव्हते.

कोण आहे ही सुनीता?

कश्मीरा म्हणाली की, 'कृष्णाबाबत फालतू गोष्टी बोलतात. होऊ शकतं की, त्या एपिसोडमध्ये कृष्णाची गरज पडली नसेल. पण हे कोण समजावून सांगणार. तसं तुम्हाला मला विचारायचं असेल तर प्रियांका चोप्राबाबत विचारा, कतरिनाबाबत विचारा....ही सुनीता कोण आहे? मी स्वत: माझं नाव कमावलं आहे. माझी ओळख कुणाची पत्नी म्हणून दिली जात नाही. त्यामुळे मला अशा लोकांबाबत बोलायचं नाहीये'.
 

Web Title: Kashmera Shah on fight between Govinda's wife Sunita and Krushna Abhishek

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app