ठळक मुद्देश्रद्धाने मयांक आनंदसोबत लग्न केले आहे. मयांक हा अभिनेता असून दिल मिल गये या मालिकेत त्याने डॉ. राहुल ही भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे दिल मिल गये या मालिकेत करण सिंग ग्रोव्हर मुख्य भूमिकेत दिसला होता.

करण सिंग ग्रोव्हर हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. करण आता त्याच्या वैयक्तिक नव्हे तर व्यवसायिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. करण कसौटी जिंदगी की २ या मालिकेत लवकरच एंट्री करणार असून तो मि. बजाज या महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे करणने कसौटी जिंदगी की या मालिकेच्या पहिल्या सिझनमध्ये प्रेरणाच्या जावयाची भूमिका साकारली होती. करण मि. बजाज या भूमिकेला योग्य न्याय देईल अशी त्याच्या चाहत्यांना खात्री आहे.

करणचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेचा विषय बनले आहे. कारण त्याने आतापर्यंत तीन लग्नं केली असून त्याच्या तिन्ही पत्नी या अभिनेत्री आहेत. त्याचे पहिले लग्न श्रद्धा निगमसोबत दुसरे जेनिफर विंगेट आणि तिसरे लग्न बिपाशा बासूसोबत झाले आहे. त्याची पहिली पत्नी श्रद्धाने चुडियाँ, कृष्णा अर्जुन, कहानी घर घर की यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. करण आणि श्रद्धाचा घटस्फोट झाल्यानंतर तिने करणच्याच एका मित्रासोबत लग्न केले. 

करण सिंग ग्रोव्हर आणि श्रद्धा निगम यांनी अनेक वर्षांच्या अफेअरनंतर लग्न केले होते. श्रद्धा आणि करण मध्ये सगळे काही सुरळीत सुरू असल्याचे सगळ्यांना वाटत होते. पण श्रद्धासोबत लग्न झाल्यावर काहीच महिन्यात त्याच्या आयुष्यात निकोल अल्वरस आली. निकोल झलक दिखला जा या कार्यक्रमात त्याची कोरिओग्राफर होती. श्रद्धाला हे कळताच तिने लग्नाच्या दहा महिन्यात त्याला घटस्फोट दिला. पण खरी गंमत म्हणजे श्रद्धासोबत लग्न करूनही करण निकोल आणि जेनिफर विंगेट यांना एकत्र डेट करत होता. त्याने श्रद्धासोबत घटस्फोट घेतल्यानंतर निकोलशी लग्न न करता जेनिफरशी लग्न केले.

करणने घटस्फोट दिल्यानंतर श्रद्धाला चांगलाच मानसिक धक्का बसला होता. कारण करण आणि श्रद्धा हे पती-पत्नी असण्याच्या आधी ते एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स होते. श्रद्धाने करणसोबत लग्न केल्यानंतर इंडस्ट्री देखील सोडली होती. सध्या ती अभिनय क्षेत्रापासून दूर असून आपले खाजगी आयुष्य एन्जॉय करत आहे. 

श्रद्धाने मयांक आनंदसोबत लग्न केले आहे. मयांक हा अभिनेता असून दिल मिल गये या मालिकेत त्याने डॉ. राहुल ही भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे दिल मिल गये या मालिकेत करण सिंग ग्रोव्हर मुख्य भूमिकेत दिसला होता. या मालिकेत करण आणि राहुल हे एकमेकांचे बेस्ट फ्रेंड्स असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते. 

करणसोबत घटस्फोट होण्याआधीपासूनच श्रद्धा आणि मयांक खूप चांगले फ्रेंड्स होते. करण सोबत घटस्फोट झाल्यानंतर श्रद्धा मयांक सोबत बिझनेस पार्टनर म्हणून काम करत होती. त्यांचे आता अनेक बुटिक्स आहेत. एकत्र काम करत असताना या दोघांमध्ये प्रेम फुलले आणि त्यांनी २०१३ मध्ये लग्न केले. सध्या ते दोघे मिळून त्यांचा व्यवसाय सांभाळत आहेत. 


Web Title: karan singh grover first wife Shraddha Nigam married to actor mayank anand
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.