The Kapil Sharma show Rajkumar Rao, Nusrat chhalaang movie team | बाप रे बाप! चक्क भारतीला कडेवर घेऊन फिरला राजकुमार राव, कपिलचं नुसरतसोबत फ्लर्ट

बाप रे बाप! चक्क भारतीला कडेवर घेऊन फिरला राजकुमार राव, कपिलचं नुसरतसोबत फ्लर्ट

द कपिल शर्मा शोमध्ये यावेळी 'छलांग' सिनेमाचा मुख्य अभिनेता राजकुमार राव आणि नुसरत भरूचा आले होते. दोघांसोबत शोमध्ये चांगलीच मजा-मस्ती होणार आहे. शोच्या अपकमिंग एपिसोडा प्रोमो समोर आला आहे. ज्यात राजकुमार राव कॉमेडियन भारती सिंहला कडेवर घेऊन फिरताना दिसला.  आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी दोघेही या शोमध्ये आले होते.

प्रोमोमधून हा एपिसोड चांगलाच मजेदार झाला आहे. आधीतर कपिल शर्मा आणि टीमने डान्स करत सर्वांच स्वागत केलं. यादरम्यान भारती, राजकुमार रावला खाली पाडते. कपिल शर्मा नुसरतसोबत फ्लर्ट करताना आणि मस्ती करताना दिसत आहे. तो नुसरतला म्हणतो की, तुझ्या गळ्यात जो नेकलेस आहे तो फार सुंदर आहे. नुसरत त्यावर धन्यवाद देते. नंतर कपिल म्हणतो की, हा गळ्यात घातलाय की अडकलाय. 

राजकुमार रावने भारतीला उचलून घेतलं

यादरम्यान भारतीची एन्ट्री होते आणि राजकुमार राव तिला कडेवर घेऊन फिरतो. भारती नुसरतला म्हणते की, मलाही मोठी झाल्यावर टॉपची अभिनेत्री व्हायची इच्छा होती. यावर कपिल तिला विचारतो की, बनली का नाही. भारती उत्तर देते की, मोठी झाले पण जाडीही झाले. 

दरम्यान, हंसल मेहता यांनी दिग्दर्शित केलेला 'छलांग' १३ नोव्हेंबरला रिलीजसाठी तयार आहे. हा सिनेमा हरयाणाच्या पार्श्वभूमीवर तयार केला आहे. यात राजकुमार राव एका पीटी टीचरची भूमिका साकारत आहे. तर नुसरतही एका हरयाणवी शिक्षिकेची भूमिका साकारणार आहे.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The Kapil Sharma show Rajkumar Rao, Nusrat chhalaang movie team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.