Kapil Sharma and Sunil Grover do not appear to be together, this is because the reason | कपिल शर्मा व सुनील ग्रोवर दिसणार नाही एकत्र, हे आहे कारण
कपिल शर्मा व सुनील ग्रोवर दिसणार नाही एकत्र, हे आहे कारण

ठळक मुद्देसुनील ग्रोवर सध्या भारतच्या शूटिंगमध्ये व्यग्रसुनील ग्रोवर दिसणार नाही कपिल शर्मा शोमध्ये

कपिल शर्मा शोला खूप चांगली टीआरपी मिळत असून हा कार्यक्रम लोकांच्या पसंतीस पडतो आहे. कपिल शर्मा शोच्या पहिल्या सीझनमध्ये कपिल व सुनील ग्रोवर यांनी मिळून लोकांना खळखळून हसविले. मात्र काही मतभेदांमुळे सुनील ग्रोवरने हा शो सोडला. आता अशी माहिती मिळतेय की, कपिल शर्मा शोमध्ये डॉ. गुलाटी म्हणजेच सुनील ग्रोवरची एन्ट्री होणार आहे. मात्र हे वृत्त चुकीचे आहे. 

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार सुनील ग्रोवर सध्या आगामी चित्रपट भारतच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. त्यामुळे जवळपास तो दीड महिने चित्रीकरणात व्यस्त राहणार आहे. याचा अर्थ सनील ग्रोवर कपिल शर्मा शोमध्ये दिसणार नाही.


सुनील ग्रोवरचा शो कानपूर वाले खुरानाजची निर्माते म्हणाले की,  त्याचा भारत चित्रपटाच्या तारखा आधापासून शेड्युल होत्या. आम्हाला शो संपवण्यासाठी त्यांच्याकडून तारखा हव्या होत्या. मात्र सुनील कडे अजिबात वेळ नाही.


सुनील ग्रोवरचा कानपूर वाले खुरानाज हा शो बंद होणार आहे. सुनील हा शो सोडतो आहे. सुनीलने हा शो फक्त १६ एपिसोडचा साइन केला होता. एवढ्या कमी भागांचा शो साइन केला होता. कारण त्याला भारत चित्रपटाचे शूटिंग करायचे होते. शो स्वीकारण्याआधी त्याने भारत चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या तारखा सांगितल्या होत्या. त्यामुळे सध्या सुनील ग्रोवर भारतच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासह सलमान खान, कतरिना कैफ, दिशा पटानी व तब्बू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा ईदला प्रदर्शित होणार आहे.


Web Title: Kapil Sharma and Sunil Grover do not appear to be together, this is because the reason
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.