kannada tv actress mebeina michael dies in road accident gda | 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीचे रस्ते अपघातात निधन, इंडस्ट्रीवर पसरली शोककळा

'या' प्रसिद्ध अभिनेत्रीचे रस्ते अपघातात निधन, इंडस्ट्रीवर पसरली शोककळा

कन्नड टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री मेबिना मायकलचे अपघातात मृत्यू झाला आहे. ती फक्त 22 वर्षांची होती. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्ट ती आपल्या होमटाऊन मेदिकेरीला जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. मेबिना पॉप्युलपुर रिअॅलिटी शो प्याते हुदगीर हल्ली लाइफ सीजन 4'ची विजेती होती.  मेबिना कन्नड टीव्हीवरील प्रसिद्ध चेहरा होती. तिच्या अकस्मित मृत्युमुळे कन्नड टीव्ही इंडस्ट्रीवर शोककाळ पसरली आहे. 


रिपोर्टनुसार मेबिना आपल्या मित्रांसोबत कारने मेदीकेरी जात असताना त्यांच्या कारची आणि ट्रॅक्टरची टक्कर झाली. या अपघातानंतर त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले. तिथे मेबिनाने शेवटचा श्वास घेतला तर तिच्या मित्रांची प्रकृती गंभीर आहे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.  बेंगळुरु पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करतायते. मेबिनाच्या निधनांमुळे तिचे कुटुंबीय आणि मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला आहे. कन्नड टीव्ही इंडस्ट्रीमधून मेबिनाला सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. 'प्याते हुदगीर हल्ली लाइफ लाइफ सीजन 4' चा सूत्रसंचालक अकुल बालाजीने मेबिनाच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: kannada tv actress mebeina michael dies in road accident gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.