kamya punjabi trolled personal comment her boyfriend blasts on troller | युजरवर बरसला काम्या पंजाबीचा बॉयफ्रेन्ड, वाचा काय आहे प्रकरण

युजरवर बरसला काम्या पंजाबीचा बॉयफ्रेन्ड, वाचा काय आहे प्रकरण

ठळक मुद्देकाम्याने पहिल्या पतीला लग्नाच्या 10 वर्षानंतर 2013 साली घटस्फोट दिला होता.

अभिनेत्री काम्या पंजाबी लवकरच बॉयफ्रेन्ड शलभ डांगसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. काम्या आणि शलभ दोघांचेही हे दुसरे लग्न असेल. काही दिवसांपूर्वी काम्याने शलभसोबतच्या रिलेशनशिपची कबुली दिली होती. सोशल मीडियावर आपले रिलेशनशिप जाहीर केल्यानंतर काम्या सर्रास शलभसोबतचे फोटो शेअर करत असते. शलभही काम्यासोबतचे फोटो शेकर करतो. असाच एक फोटो त्याने शेअर केला. पण यावेळी हा फोटो पाहून एका ट्रोलरने काम्यावर पर्सनल अटॅक केला. या युजरचा पर्दाफाश करत, काम्याने त्याच्या कमेंट्सचा स्क्रीनशॉट शेअर केला. काम्याचा बॉयफ्रेन्ड शलभ यानेही या युजरचा क्लास घेतला.
आता हे प्रकरण काय आहे, हे जाणून घेऊ या. त्याचे झाले असे की,   बॉयफ्रेन्ड शलभ डांग याने काम्यासोबतचा एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला. ‘तुझ्या चेह-यावरचा हा आनंदी भाव कायम राहील, मी वचन देतो,’ असे हा सेल्फी शेअर करताना शलभने लिहिले. पण हा सेल्फी पाहून ‘रोमिल स्वॉड आणि एंटी शुक्ला बीबी 13’नामक युजरने काम्यासाठी आक्षेपार्ह भाषा वापरत कमेंट्स केली. ‘तू काय या दोन रूपयाच्या स्त्रीसोबत आहेस? ती सतत रिअ‍ॅलिटी शोमध्ये अन्य महिलांना कमी लेखते. स्वत:च्या आनंदासाठी ती स्वत:च्या मुलीलाही विकेल,’ असे या युजरने लिहिले.
युजरची ही कमेंट वाचून काम्या संतापली. या कमेंटचा स्क्रीनशॉट शेअर करत तिने त्याला चांगलेच सुनावले. ‘या जेंटलमॅनसाठी कुठला शब्द आहे? कदाचित याच्या आईने याला विकले असावे. त्याचाच राग इथे काढतोय,’अशा शब्दांत काम्याने या युजरला सुनावले. 

केवळ काम्याच नाही तर तिचा बॉयफ्रेन्ड शलभनेही या युजरचा क्लास घेतला. ‘हिंमत असेल तर तुझ्या अकाऊंटवर तुझा खरा फोटो लाव. एक महिला आणि तिच्या निष्पाप मुलीबद्दल अशा शब्दांचा वापर करण्याचा अधिकार तुला कुणी दिला? तुला वैद्यकीय उपचारांची गरज आहे,’ अशा शब्दांत शलभने आपला संताप व्यक्त केला.

  शलभ डांग दिल्लीत राहणारा असून तो हेल्थकेअर बिझनेसमन आहे. काम्याने पहिल्या पतीला लग्नाच्या 10 वर्षानंतर 2013 साली घटस्फोट दिला होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: kamya punjabi trolled personal comment her boyfriend blasts on troller

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.