टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबी लवकरच विवाह बंधनात अडकण्यास सज्ज झाली आहे. काम्या बॉयफ्रेंड शलभ डांगसोबत सातफेरे घेणार आहे. 10 फ्रेब्रुवारी 2020 मध्ये काम्या बॉयफ्रेंड शलभसह लग्न करणार आहे. काम्याने तिच्या शलभच्या लग्नाच्या पत्रिकेची एक झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याला काम्याने एक कॅप्शनसुद्धा दिले आहे. गणपती बप्पा मोरया, #ShubhMangalKaSha असे लिहिले आहे. शलभने सुद्धा या व्हिडीओवर कमेंट केली आहे. 


कामाच्या लग्नाच्या विधी 9 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत. 9 ला हळद, महेंदी आणि संगीत आहे. तर 10 फेब्रुवारीला लग्न त्यानंतर 11 फेब्रुवारीला काम्या मित्र मंडळी आणि जवळच्या नातेवाईकासांठी एका ग्रँड पार्टीचे आयोजनही करणार आहे. कुटुंबाच्या सहमतीनेच लग्नाचा निर्णय घेतला असून आता आम्ही जास्त दिवस एकमेकांपासून दूर राहू शकत नाही. त्यामुळे लग्न करत आयुष्याची सुंदर सुरूवात करण्याचा निर्णय घेतल्याचे ती सांगायला विसरली नाही. तर लवकरच दोघे दिल्लीमध्ये सुद्धा रिसेप्शन देणार आहेत.


शलभ डांग दिल्लीत राहणारा असून तो हेल्थकेअर बिझनेसमन आहे. काम्या पंजाबीचे हे दुसरं लग्न आहे. काम्याने पहिल्या पतीला लग्नाच्या 10 वर्षानंतर 2013 साली घटस्फोट दिला होता.

Web Title: kamya panjabi share her wedding card on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.