CID मालिकेतल्या कलाकाराची बिकट अवस्था, करोनामुळे आर्थिक अडचणींचा करावा लागतोय सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 04:05 PM2021-05-08T16:05:09+5:302021-05-08T16:10:54+5:30

अशावेळी प्रत्येकाने प्रत्येकाला समजून घेण्याची गरज आहे. एकमेकांना मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे. ओढावलेले संकट नक्कीच संपणार आहे असेही आदित्य श्रीवास्तवने सांगितले आहे.

'Just like everyone, I too faced a financial crisis during the pandemic': Aditya Srivastava | CID मालिकेतल्या कलाकाराची बिकट अवस्था, करोनामुळे आर्थिक अडचणींचा करावा लागतोय सामना

CID मालिकेतल्या कलाकाराची बिकट अवस्था, करोनामुळे आर्थिक अडचणींचा करावा लागतोय सामना

googlenewsNext

CID या मालिकेने कित्येक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी रसिकांचे कलाकारांवरील प्रेम कमी झालेले नाही. आजही प्रत्येक कलाकारा मालिकेतल्या भूमिकेमुळेच जास्त ओळखला जातो. 'सीआयडी' मालिकेसोबतच त्याच्यातील कलाकारांनीही फॅन्सच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली. या मालिकेतील सगळ्याच भूमिका तितक्याच लोकप्रिय ठरल्या आहेत. 


CID ही मालिका 1998 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली. जवळपास 21 वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. 27 ऑक्टोबर 2018 ला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. CID या मालिकेचा लिम्का बुक रेकॉर्डमध्येही समावेश झाला होता.ही मालिका आजवर सगळ्यात जास्त वर्षं टिव्हीवर प्रक्षेपित झालेली मालिका आहे. या मालिकेत दयानंद शेट्टी, शिवाजी साटम, आदेश श्रीवास्तव, दिनेश फडणीस, नरेंद्र गुप्ता, श्रद्धा मुसळे यांच्या मुख्य भूमिका होत्या. या मालिकेतील कुछ तो गडबड है, दया तोड दो दरवाजा हा संवाद प्रचंड गाजला होता. CID मध्ये इन्स्पेक्टर अभिजीत भूमिकेत झळकलेला आदित्य श्रीवास्तव सध्या चर्चेत आला आहे. 


करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. करोनामुळे अनेक उद्योगधंदे बंद आहेत. करोनाचा फटका मनोरंजन क्षेत्रालाही बसला आहे. महाराष्ट्रात सुरू झालेल्या लॉकडाउनमुळे अनेक मालिकांचं चित्रीकरण बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक कलाकार बेरोजगारीच्या उंबरठ्यावर उभे आहेत. टीव्हीवरील लोकप्रिय मालिका सीयाडी मधूल इन्सपेक्टरच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेला आदित्य श्रीवास्तवलाही कोरोनाचा फटका बसला आहे.

दिलेल्या मुलाखतीत त्याने लॉकडाऊनमधली त्याची परिस्थीती सांगितली आहे. इतरांप्रमाणे मलाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्याने म्हटले आहे. सद्यस्थिती बघता ही वेळ प्रत्येकासाठी कठीण आहे. अशावेळी तक्रार करत बसण्यापेक्षा यातून मार्ग काढत पुढे जात राहणे हाच एक उत्तम पर्याय आहे. अशावेळी प्रत्येकाने प्रत्येकाला समजून घेण्याची गरज आहे.

 

एकमेकांना मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे. ओढावलेले संकट नक्कीच संपणार आहे. त्यामुळे येणा-या काळासाठी सकारात्मक गोष्टींचा विचार करु आणि पुढे जाऊ असेही त्याने म्हटले आहे. आगामी काळात आदित्य  ‘हसीन दिलरुबा’ या सिनेमात एका महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. याच सोबत ‘ह्युमन’ या त्याच्या आगामी वेब सीरिजचं सध्या शूटिंग सुरू आहे.

Web Title: 'Just like everyone, I too faced a financial crisis during the pandemic': Aditya Srivastava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.