जुही परमारही देणार 'गुड न्युज', बेबी बम्प फ्लॉन्ट करत शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 04:56 PM2020-09-23T16:56:16+5:302020-09-23T17:02:32+5:30

'हमारी वाली गुड न्यूज' छोट्या पडद्यावर सुरू होत आहे. याच मालिकेत जूही रेणूका ही भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे आता पर्यंत संस्कारी बहूच्या भूमिकेत आपण जूहीला यापूर्वी पाहिले आहे. आता जूही सूनेच्या नाही तर सासूची भूमिकेत झळकणार आहे.

Juhi Parmar on playing Renuka in Hamari Wali Good News | जुही परमारही देणार 'गुड न्युज', बेबी बम्प फ्लॉन्ट करत शेअर केला फोटो

जुही परमारही देणार 'गुड न्युज', बेबी बम्प फ्लॉन्ट करत शेअर केला फोटो

googlenewsNext

'कुमकुम' फेम जूही परमार पुन्हा एकदा टीव्हीवर कमबॅक करते. वेगळ्याच अंदाजात ती आपल्या भेटीला येत आहे. लवकरच एका सासू सुनेवर आधारित नवीन मालिका 'हमारी वाली गुड न्यूज' छोट्या पडद्यावर सुरू होत आहे. याच मालिकेत जूही रेणूका ही भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे आता पर्यंत संस्कारी बहूच्या भूमिकेत आपण जूहीला यापूर्वी पाहिले आहे. आता जूही सूनेच्या नाही तर सासूची भूमिकेत झळकणार आहे. 'हमारी वाली गुड न्यूज' ही एक रंजक कहाणी आहे. 

या मालिकेचे कथानक आग्रा शहरात घडते. तेथील तिवारी कुटुंबही अन्य सर्वसामान्य कुटुंबियांसारखेच असून त्यातील सर्व सदस्य आपल्या परिवारात लहान पाहुण्याच्या येण्याची आतुरतेने वाट पाहात असतात.  फरक इतकाच की एरवी गर्भवती न राहिल्याबद्दल अन्य सासवांसारखी रेणुका ही आपल्या सुनेला नावे ठेवत नाही किंवा तिच्यावर दडपणही आणत नाही.

 

 

उलट लोक काय म्हणतील, या दडपणाला झुगारून देऊन सासुबाई स्वत:च आपल्या पतीकडून गर्भवती राहून आपल्या कुटुंबियांना ‘चांगली बातमी’ देण्याची तयारी करते. सुनेसाठी सासूने हे कठोर पाऊल उचलते. वंशाचा दिवा तेवत ठेवण्यासाठी आपल्याच कुटुंबियांवर अवलंबून राहणे केव्हाही योग्यच ठरते. या सासू-सुनेचे हे आगळे नाते आणि त्यांनी आपल्या नात्यात केलेली अदलाबदल हाच ‘हमारीवाली गुड न्यूज’ या नव्या मालिकेच्या कथानक आहे.

मालिकेत 23 वर्षीय नाव्या तिवारी या सुनेची भूमिका टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री सृष्टी जैन रंगवत असून ती यात बालवाडीतील मुलांना शिकविणारी शिक्षिका असते. तिला स्वत:ला आपले मूल हवे असते; पण एका लहान मुलाला वाढवण्याची जबाबदारी खूप मोठी आहे, या गोष्टीची तिला जाणीव असते. ही जबाबदारी लगेचच स्वीकारण्याची तिची तयारी नसते. योग्य वेळ येताच ती आपल्या जीवनाच्या या पुढील टप्प्यात पाऊल टाकण्याचा निर्णय घेते.तर याउलट सासू रेणुका असते.ती आपले घर सांभाळण्यातच तिला खरा आनंद मिळतो. मनाने कितीही खंबीर असली तरीही  देवभोळी असते. आजूबाजूच्या घरांतील सासवांचा समावेश असलेल्या आपल्या भागातील कीर्तन मंडळीची ती सदस्य असते. आगामी काळात ही मालिका रसिकांचे कितपत मनोरंजन करते हेच पाहणे रंजक असणार आहे. 
 

Web Title: Juhi Parmar on playing Renuka in Hamari Wali Good News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.