आदित्य नारायणने 'इंडियन आइडल 12' ला ठोकला रामराम, आता प्रसिध्द अभिनेता शोला करणार होस्ट 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 11:45 AM2021-04-02T11:45:53+5:302021-04-02T11:49:06+5:30

Aditya was hosting india idol,आदित्यच्या फॅन्ससाठी निराश करणारी बातमी आहे.आदित्यने हा शो सोडल्याचे खुद्द आदित्यने सांगितले आहे.

Jay Bhanushali REPLACES Aditya Narayan as host for an episode of Indian Idol | आदित्य नारायणने 'इंडियन आइडल 12' ला ठोकला रामराम, आता प्रसिध्द अभिनेता शोला करणार होस्ट 

आदित्य नारायणने 'इंडियन आइडल 12' ला ठोकला रामराम, आता प्रसिध्द अभिनेता शोला करणार होस्ट 

googlenewsNext

'इंडियन आइडल 12' शो सध्या प्रचंड चर्चेत आहे. या शोला आदित्य नारायण होस्ट करत होता.या शोमुळे त्याला प्रचंड पैसा प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळाली. 

आदित्यच्या फॅन्ससाठी निराश करणारी बातमी आहे.आदित्यने हा शो सोडल्याचे खुद्द आदित्यने सांगितले आहे.गेल्या काही दिवसापासून त्याची तब्येत बरी नाहीय.त्यात शूटिंग करण्यासाठी तो इतका फिट नव्हता.अशक्तपणा मुळे त्याला जास्त काम करणे शक्य नाही. आराम करता यावा म्हणून त्याने शो सोडला आहे.

आदित्यच्या जागी जय भानुशाली या शो होस्ट करणार आहे. त्यामुळे जय भानुशालीच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची गोष्ट असणार. आदित्य नारायण अलीकडेचं लग्नाच्या बेडीत अडकला आहे. १ डिसेंबरला आदित्यने त्याची गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालशी लग्न केले.  आदित्य आणि श्वेताच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.  कोरोनामुळे आदित्यच्या लग्नात कुटुंबातील आणि जवळचे नातेवाईक असे 50 पाहुणेचं उपस्थित होते.

आदित्यने श्वेतासाठी ५ बीएचकेचा एक सुंदर फ्लॅट विकत घेतला होता. हा फ्लॅट आदित्यच्या आई- वडिलांच्या घरापासून फक्त तीन इमारती सोडून आहे.  त्यांच्या नवीन घरात दोघांनी नवीन संसार सुरू केला आहे.

आदित्य आणि श्वेताची भेट १० वर्षांपूर्वी 'शापित' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. यानंतर दोघांनीही एकमेकांना डेट करण्यास सुरवात केली. जेव्हा आदित्य आणि श्वेताच्या चित्रपटांमधील कारकीर्द चालली नाही तेव्हा आदित्यने छोट्या पडद्याकडे आपला मोर्चा वळवला आणि आपल्या गाण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. त्यांनतर आदित्य सोनी टीव्हीचा सिंगिंग रिअ‍ॅलिटी शो इंडियन आयडल होस्ट करताना दिसला होता.

Web Title: Jay Bhanushali REPLACES Aditya Narayan as host for an episode of Indian Idol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.