ठळक मुद्देलोकांचा हेवा करणे बंद कर, नाहीतर तुझीच नौका डुबेन, असे एका युजरने तिला ट्रोल करताना लिहिले.

जास्मीन भसीन ‘बिग बॉस 14’मुळे कधी नव्हे इतकी चर्चेत आली. याच घरात जास्मीनला एकीकडे प्रेम मिळाले आणि दुसरीकडे रूबीना दिलैकसारखी ‘शत्रू’. होय, खरे तर रूबीना व जास्मीन आधी चांगल्या मैत्रिणी होत्या. पण शो जसाजसा पुढे गेला तशी तशी दोघींमधील मैत्रीत इतकी कटुता आली की, शो संपला तरी ही कटुता संपण्याची चिन्हं नाहीत. होय, तूर्तास सोशल मीडियावर याचा प्रत्यय येतोय आणि यानिमित्ताने रूबीना व जास्मीनच्या चाहत्यांमध्ये ‘वॉर’ सुरु झाले आहे.


तर झाले काय की, आज जास्मीनने तिच्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये भलेही तिने कोणाचे नाव लिहिले नाही. पण तिचा इशारा लोकांनी समजला. ‘काही लोक खरोखर स्वत:ची गोष्ट खरी करून दाखवणारे असतात. ते खोटे बोलू शकतात, धोका देऊ शकतात, तुमच्यासोबत वाईट वागू शकतात आणि सरतेशेवटी तुम्हाला चूक ठरवून मोकळे होतात,’ असे जास्मीनने तिच्या पोस्टमध्ये लिहिले.

या ट्विटमध्ये जास्मीनने कोणाचाही नामोल्लेख केलेला नाही. पण तिचा निशाणा अचूक जागी लागला. अर्थात या निगेटीव्ह पोस्टमुळे जास्मीनला ट्रोलही व्हावे लागले. अनेक युजर्सनी या निगेटीव्ह पोस्टसाठी जास्मीनला चांगलेच फैलावर घेतले.

मुली, तुझ्या मनात किती द्वेष भरलेला आहे. बिग बॉस संपला आहे. आता तरी त्यातून बाहेर पड आणि रूबीनाला टोमणे मारणे बंद कर, असे एका युजरने जास्मीनला सुनावले. तुझ्याकडे कोणते काम नाही का? जस्ट मुव्ह आॅन, असे एकाने तिला सुनावले. लोकांचा हेवा करणे बंद कर, नाहीतर तुझीच नौका डुबेन, असे एका युजरने तिला ट्रोल करताना लिहिले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: jasmin bhasin cryptic post hinting towards rubina dilaik angery users slam her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.