जाणून घ्या किती मानधन घेतात ‘Indian Idol 12’चे परिक्षक नेहा कक्कर, विशाल व हिमेश रेशमिया?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 06:22 PM2021-05-05T18:22:32+5:302021-05-05T18:26:18+5:30

Indian Idol 12 : नेहा कक्कर आजघडीला किती मोठी सिंगर आहे, हे तुम्ही जाणताच. त्यामुळे तिची फी सुद्धा तगडीच असणार. नेहा इंडियन आयडलची सर्वात महागडी जज आहे.

indian idol 12 neha kakkar vishal dadlani himesh reshammiya charge an episode in millions | जाणून घ्या किती मानधन घेतात ‘Indian Idol 12’चे परिक्षक नेहा कक्कर, विशाल व हिमेश रेशमिया?

जाणून घ्या किती मानधन घेतात ‘Indian Idol 12’चे परिक्षक नेहा कक्कर, विशाल व हिमेश रेशमिया?

Next
ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर  या शोच्या गेल्या काही एपिसोडमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. गेल्या दोन एपिसोडमध्ये तिन्ही जज गैरहजर दिसले. त्यांच्याजागी अन्नू मलिक व मनोज मुंतशीर यांनी हा शो जज केला.

सध्या ‘इंडियन आयडल’चा 12 वा (Indian Idol 12 ) सीझन जाम चर्चेत आहे. कधी या शोमधील स्पर्धकांमुळे, कधी जजेसमुळे तर कधी या शोमध्ये हजेरी लावणा-या स्पेशल गेस्टमुळे. ए.आर. रहमान, जया प्रदा, आनंदजी, जितेन्द्र, एकता कपूर, धर्मेन्द्र, हेमा मालिनी, रेखा, नीतू कपूर, जयाप्रदा अशा अनेक स्पेशल गेस्टमुळे यंदाचा सीझन गाजला. शोचे स्पर्धक अरूणिता कांजीलाल, पवनदीप राजन, सवाई भट यांच्या आवाजानेही चाहत्यांना प्रभावित केले. पण तूर्तास आम्ही या शोबद्दल नाही तर शोच्या जजेसबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.

नेहा कक्कर, विशाल ददलानीहिमेश रेशमिया (Neha Kakkar Vishal Dadlani Himesh Reshammiya) यांना हा शो जज करताना तुम्ही बघत असालच. पण यासाठी हे तिन्ही जज किती मानधन घेतात, हे तुम्हाला ठाऊक आहे का?

तर आधी बोलुया नेहा कक्कर हिच्याबद्दल. नेहा कक्कर आजघडीला किती मोठी सिंगर आहे, हे तुम्ही जाणताच. त्यामुळे तिची फी सुद्धा तगडीच असणार. बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, नेहा कक्कर इंडियन आयडलची सर्वात महागडी जज आहे. शोच्या एका एपिसोडसाठी ती सुमारे 5 लाख रूपये मानधन घेते.
विशाल ददलानी हा किती मानधन घेतो तर नेहापेक्षा थोडे कमी. होय, रिपोर्टनुसार, गायक व कंपोजर विशाल ददलानी प्रत्येक एपिसोडसाठी सुमारे साडे चार लाख रूपये मानधन घेतो.

बॉलिवूडमध्ये अनेक हिट गाणी गायलेला हिमेश रेशमिया त्यापेक्षा कमी म्हणजे, एका एपिसोडसाठी 4 लाख रूपये मानधन घेतो.
आता उरला कोण तर इंडियन आयडलचा होस्ट. सध्या शोचा 12 वा सीझन आदित्य नारायण होस्ट करतोय. तो प्रत्येक एपिसोडसाठी 2.50 लाख रूपये मानधन घेतो.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  या शोच्या गेल्या काही एपिसोडमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. गेल्या दोन एपिसोडमध्ये तिन्ही जज गैरहजर दिसले. त्यांच्याजागी अन्नू मलिक व मनोज मुंतशीर यांनी हा शो जज केला. पण आता विशाल, हिमेश व नेहा तिघेही शोमध्ये परतले असून त्यांनी शूटींग पूर्ण केले आहे. त्यामुळे आगामी एपिसोडमध्ये पुन्हा ही तिकडी शो जज करताना दिसेल.
 
 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: indian idol 12 neha kakkar vishal dadlani himesh reshammiya charge an episode in millions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app