Indian Idol 12:  नेटकरी जोमात, जजेस कोमात...; पाहा पोट धरून हसायला लावणारे मीम्स

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 12:10 PM2021-06-15T12:10:51+5:302021-06-15T12:11:38+5:30

Indian Idol 12: बात बात पर ड्रामा... मग मीम्स तर बनणार; नेहा कक्कर, हिमेश रेशमिया, विशाल ददलानी पुन्हा ट्रोल

indian idol 12 judges neha kakkar vishal dadlani and himesh reshammiya trolled on social media | Indian Idol 12:  नेटकरी जोमात, जजेस कोमात...; पाहा पोट धरून हसायला लावणारे मीम्स

Indian Idol 12:  नेटकरी जोमात, जजेस कोमात...; पाहा पोट धरून हसायला लावणारे मीम्स

Next
ठळक मुद्देगेल्या काही आठवड्यांपासून शोची स्पर्धक शन्मुखप्रिया हिलाही असेच ट्रोल केले जातेय. लोक तिला शोमधून बाहेर काढण्याची मागणी करत आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा सिंगींग रिअ‍ॅलिटी शो ‘इंडियन आयडल’ कायम चर्चेत असतो. पण यंदाचा या शोचा 12 वा सीझन जरा जास्तच चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून हा शो, शोचे काही स्पर्धक सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल होत आहेत. आता काय तर शोचे जजेस ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहेत. नेहा कक्कर (Neha Kakkar), हिमेश रेशमिया (Himesh Reshammiya) आणि विशाल ददलानी  (Vishal Dadlani) यांच्यावरचे भन्नाट मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे मीम्स पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

‘इंडियन आयडल 12’  (Indian Idol 12) सुरु झाले तेव्हा नेहा, विशाल व हिमेश या शोचे जज होते. पण गेल्या काही दिवसांपासून शोमध्ये सतत जजेसची अदलाबदली सुरू आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू झाल्यावर शोचा सेट दमणला हलवण्यात आला आणि इथे जाण्यास नेहा व विशालने नकार दिला. यानंतर काही दिवस अनु मलिक व मनोज मुंतशीर यांनी शो जज केला. गेल्या काही दिवसांपासून हिमेश शोमध्ये परतला आहे. पण नेहा व विशालचा पत्ता नाही. चर्चा खरी मानाल तर विशालचा शोमध्ये परतण्याचा आता कुठलाही इरादा नाही. अर्थात तरिही सोशल मीडियावर हिमेश, नेहा व विशाल यांना ट्रोल केले जातेय.
या तिघांचा ड्रामा, त्यांचा ओव्हर द टॉप रिअ‍ॅक्शन यावरचे मीम्स व्हायरल होत आहेत.
गेल्या काही आठवड्यांपासून शोची स्पर्धक शन्मुखप्रिया हिलाही असेच ट्रोल केले जातेय. लोक तिला शोमधून बाहेर काढण्याची मागणी करत आहेत.

Read in English

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: indian idol 12 judges neha kakkar vishal dadlani and himesh reshammiya trolled on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app