नानू हलवाई से नानू जलवाई...! आदित्य नारायणचे गजब ट्रान्सफॉर्मेशन पाहून आली भन्नाट कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 05:20 PM2021-06-15T17:20:08+5:302021-06-15T17:20:59+5:30

Aditya Narayan transformation : आदित्यचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहत्यांसोबत सेलिब्रिटीही थक्क झाले आहेत. अनेक सेलिब्रिटींनी त्याच्या फोटोंवर कमेंट केल्या आहेत.

indian idol 12 host Aditya Narayan transformation SHOCK YOU | नानू हलवाई से नानू जलवाई...! आदित्य नारायणचे गजब ट्रान्सफॉर्मेशन पाहून आली भन्नाट कमेंट

नानू हलवाई से नानू जलवाई...! आदित्य नारायणचे गजब ट्रान्सफॉर्मेशन पाहून आली भन्नाट कमेंट

Next
ठळक मुद्दे वयाच्या 8 वर्षी आदित्य तीन सिनेमांत झळकला होता. रंगीला, परदेस आणि जब प्यार किसी से होता है या सिनेमात त्याने बालकलाकाराची भूमिका वठवली होती.

‘इंडियन आयडल 12’चा (Indian Idol 12) होस्ट आदित्य नारायण (Aditya Narayan) दोन महिन्यांपूर्वी शोमधून गायब झाला होता. कारण होते कोरोना. आदित्यला कोरोना झाला होता आणि यानंतर त्याची स्थिती फारच खराब झाली होती. होय, वजन प्रचंड वाढले होते आणि सोबत पोटाचा घेरही. पण आता आदित्य एकदम फिट झालाय. अगदी परफेक्ट लुकमध्ये परतला आहे. अगदी त्याचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून तुम्हीही अवाक व्हाल.


आदित्यने त्याच्या ट्रान्सफॉर्मेशनचे दोन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत आदित्य नारायणचे पोट सुटलेलं दिसतंय.

हा फोटो एप्रिल महिन्याच. याच महिन्यात आदित्यला कोरोनाची लागण झाली होती आणि तो होम क्वारंटाइनमध्ये होता.
दुसरा फोटो तो कोरोनातून बरा झाल्यानंतरचा आणि वजन घटवल्यानंतरचा आहे. हा फोटो जून महिन्यातला आहे.

आदित्यचे हे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहिल्यानंतर चाहत्यांसोबत सेलिब्रिटीही थक्क झाले आहेत. अनेक सेलिब्रिटींनी त्याच्या या फोटोंवर कमेंट केल्या आहेत.  (Aditya Narayan transformation) 
अभिनेता विक्रांत मेस्सीने आदित्यच्या या लूकचे कौतुक करत, Wooooaaaaahhhhhh!!!!! Whattayyyy wowwwww!! नानू हलवाई से नानू जलवाई,अशी प्रतिक्रिया दिली आहे.


आदित्यने 2014 साली स्वत:चा बँड सुरु केला होता. त्याचे नाव आहे THE A TEAM.  आदित्यने आतापर्यंत 120 गाणी गायली आहेत. तोसुद्धा त्याच्या आईवडिलांप्रमाणे 16 वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी गातो. ‘छोटा बच्चा जान के हमको’ या गाण्यातून आदित्य प्रसिद्धीझोतात आला.  वयाच्या 8 वर्षी आदित्य तीन सिनेमांत झळकला होता. रंगीला, परदेस आणि जब प्यार किसी से होता है या सिनेमात त्याने बालकलाकाराची भूमिका वठवली होती. सध्या आदित्य  इंडियन आयडलचा 12 वा सीझन होस्ट करतोय. 


 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: indian idol 12 host Aditya Narayan transformation SHOCK YOU

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app