मुझे तुमसे प्यार है....,‘इंडियन आयडल 12’ फेम सायली कांबळेने खुल्लमखुल्ला दिली प्रेमाची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 11:31 AM2021-09-23T11:31:51+5:302021-09-23T11:33:03+5:30

निहार तारो नाही तर हा आहे सायलीच्या स्वप्नातील राजकुमार, पाहा फोटो...

indian idol 12 fame sayli kamble reveal she is in love with dhawal | मुझे तुमसे प्यार है....,‘इंडियन आयडल 12’ फेम सायली कांबळेने खुल्लमखुल्ला दिली प्रेमाची कबुली

मुझे तुमसे प्यार है....,‘इंडियन आयडल 12’ फेम सायली कांबळेने खुल्लमखुल्ला दिली प्रेमाची कबुली

Next
ठळक मुद्दे‘इंडियन आयडल 12’ संपल्यानंतर सायलीने ‘कोल्हापूर डायरी’ या सिनेमासाठी आपला आवाज दिला. अवधुत गुप्तेने या चित्रपटाला संगीत दिलं आहे.

‘इंडियन आयडल’ या सिंगींग रिअ‍ॅलिटी शोचा 12 वा सीझन कधीच संपला. पण या सीझनच्या स्पर्धकांची चर्चा अजुनही आहे. तूर्तास चर्चेत आहे ती, ‘इंडियन आयडल 12’ची (Indian Idol 12) सेकंड रनरअप सायली कांबळे(Sayli Kamble). होय, सायलीने तिच्या लव्हलाईफचा खुलासा केला आहे.
‘इंडियन आयडल 12’मध्ये असताना सायलीच्या लव्ह लाईफची चर्चा अशीच रंगली होती. शोचा कंटेस्टंट निहाल तारोसोबत तिचं नाव जोडलं गेलं होतं. पण हा केवळ शोचा टीआरपी वाढवण्यासाठीचा फंडा होता, हे आता स्पष्ट झालंय. कारण सायलीने तिच्या लव्हलाईफचा खुलासा केला. निहाल नाही तर सायलीच्या स्वप्नांचा राजकुमार दुसराच कोणी असल्याचे आता स्पष्ट झालं आहे.

प्रियकरासोबतचा एक रोमॅन्टिक फोटो शेअर करत तिने प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. इतकंच नाही तर प्रियकराच्या नावाचाही खुलासा केला आहे. या फोटोत सायली बॉयफ्रेन्ड धवलसोबत दिसतेय. ‘चलो जी आज साफ साफ कहती हंू... इतनी सी बात है, मुझे तुमसे प्यार है, धवल...’, अशी पोस्ट तिने शेअर केली आहे. सायलीची ही पोस्ट तुफान व्हायरल होतेय.
प्रेमाची कबुली दिल्यानंतर चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ‘इंडियन आयडल 12’च्या स्पर्धकांनीही तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
‘इंडियन आयडल 12’ संपल्यानंतर सायलीने ‘कोल्हापूर डायरी’ या सिनेमासाठी आपला आवाज दिला. अवधुत गुप्तेने या चित्रपटाला संगीत दिलं आहे.

‘इंडियन आयडल 12’ सुरू असताना सायली कांबळेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओत ती सुरेश वाडकर यांच्यासोबत गाताना दिसली होती. हा व्हिडीओ व्हायरल होताच सायली नेटकºयांच्या निशाण्यावर आली होती. सायलीने ‘इंडियन आयडल 12’मध्ये घरची परिस्थिती सांगितली होती.  मी एका चाळीत राहाते. माझ्या घरात टीव्हीदेखील नाहीये. माझे वडील रुग्णवाहिका चालक आहेत, असा खुलासा तिने केला होता.  पण सुरेश वाडकर यांच्यासारख्या दिग्गजांसोबत  स्टेज परफॉर्मन्स देतानाचा तिचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सायलीवर खोटं बोलल्याचा आरोप नेटकºयांनी केला होता.  

Web Title: indian idol 12 fame sayli kamble reveal she is in love with dhawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app