Indian Idol 12 : आशीष कुलकर्णी बाद होताच पुन्हा भडकले चाहते; म्हणाले, हा अन्याय...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 12:41 PM2021-07-12T12:41:57+5:302021-07-12T12:43:37+5:30

Indian Idol 12 : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘इंडियन आयडल 12’ या रिअ‍ॅलिटी शोमधून काल आणखी एक एलिमिनेशन झाले आणि यानंतर नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

indian idol 12 ashish kulkarni eliminated users call it unfair eviction | Indian Idol 12 : आशीष कुलकर्णी बाद होताच पुन्हा भडकले चाहते; म्हणाले, हा अन्याय...!!

Indian Idol 12 : आशीष कुलकर्णी बाद होताच पुन्हा भडकले चाहते; म्हणाले, हा अन्याय...!!

googlenewsNext
ठळक मुद्देइंडियन आयडलमधून आशीष कुलकर्णी बाद झाल्यानंतर आता शोमध्ये केवळ  शन्मुखप्रिया, दानिश, सायली, पवनदीप, अरूणिता, निहाल असे टॉप 6 स्पर्धक उरले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘इंडियन आयडल 12’ ( Indian Idol 12 ) या रिअ‍ॅलिटी शोमधून काल आणखी एक एलिमिनेशन झाले आणि यानंतर नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. पब्लिक वोटच्या आधारावर आशीष कुलकर्णी (Ashish Kulkarni ) काल शोमधून बाद झाला आणि चाहते भडकले. आशीषचे एलिमिनेशन ‘अनफेअर’ असल्याचे सांगत लोकांनी आपली भडास काढली. याआधी सवाई भट, नचिकेत लेले, अंजली गायकवाड यांच्या एलिमिनेशननंतरही चाहत्यांनी अशीच भडास काढली होती. (Indian Idol 12 Contestant Ashish Kulkarni eliminated)

आशीष कुलकर्णीच्या एलिमिनेशनच्या निमित्ताने अनेक चाहत्यांनी पुन्हा एकदा शन्मुखाप्रिया हिला ट्रोल केले. मेकर्स, तुम्ही शन्मुखप्रियाला कधी बाहेर काढता ते सांगा, म्हणजे मी पुन्हा शो पाहू शकेल, असे एका चाहतीने लिहिले.

आणखी एक अन्याय, आशीष कुलकर्णीसारख्या उत्तम गायकाला तुम्ही कसे काय बाहेर काढू शकता? असा सवाल एका चाहत्याने केला. इंडियन आयडल हा शो पक्षपाती आहे, असा आरोपही अनेकांनी केला.

आशीषची भावुक पोस्ट...
‘इंडियन आयडल 12’मधून बाहेर पडल्यानंतर आशीषने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट लिहित आपल्या सर्व चाहत्यांचे आभार मानले. ‘इंडियन आयडलच्या माझ्या शेवटच्या दिवशी ही पोस्ट लिहिताना माझ्याकडे शब्द अपुरे पडत आहेत. मी कुठलीही थँक्यु पोस्ट लिहिणार नाही. याऊलट माझ्या या छोट्याशा प्रवासातील प्रत्येकांचे कौतुक करू इच्छितो. या शोमधील प्रत्येक स्पर्धकाचे अभिनंदन करू इच्छितो. शन्मुखप्रिया, दानिश, सायली, पवनदीप, अरूणिता, निहाल... भविष्यात तुम्हा सर्वांसोबत काम करण्याची मी आतुरतेने प्रतीक्षा करतोय,’ असे त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले.

‘हे’ असणार टॉप 6 स्पर्धक 
इंडियन आयडलमधून आशीष कुलकर्णी बाद झाल्यानंतर आता शोमध्ये केवळ  शन्मुखप्रिया, दानिश, सायली, पवनदीप, अरूणिता, निहाल असे टॉप 6 स्पर्धक उरले आहेत. म्हणजेच यापैकी एक ग्रँड फिनालेमध्ये ‘इंडियन आयडल 12’ची ट्रॉफी जिंकेल. शोचा फिनाले काही आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. येत्या 15 ऑगस्टला शोचा फिनाले आहे. 

Web Title: indian idol 12 ashish kulkarni eliminated users call it unfair eviction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.