आदित्य नारायणनेच केला ‘इंडियन आयडल’चा पर्दाफाश; म्हणाला, तो ‘लव्हअँगल’ खोटा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 07:00 PM2021-05-18T19:00:06+5:302021-05-18T19:00:56+5:30

Indian Idol 12: ‘इंडियन आयडल’चा प्रत्येक सीझन चर्चेत असतो तो टीआरपीमुळे, पण सध्या या शोचा 12 वा सीझन चर्चेत आहे तो ड्रामेबाजीमुळे. 

indian idol 12 aditya narayan accept pawandeep rajan and arunita kanjilal love angel is fake | आदित्य नारायणनेच केला ‘इंडियन आयडल’चा पर्दाफाश; म्हणाला, तो ‘लव्हअँगल’ खोटा

आदित्य नारायणनेच केला ‘इंडियन आयडल’चा पर्दाफाश; म्हणाला, तो ‘लव्हअँगल’ खोटा

Next
ठळक मुद्दे फक्त रिअ‍ॅलिटीवर फोकस करा आणि उर्वरित गोष्टी फक्त एन्जॉय करा, असेही आदित्य यावेळी म्हणाला.

‘इंडियन आयडल’चा प्रत्येक सीझन चर्चेत असतो तो टीआरपीमुळे, पण सध्या या शोचा 12 वा सीझन चर्चेत आहे तो ड्रामेबाजीमुळे. होय, टीआरपीसाठी रिअ‍ॅलिटी शोच्या नावावर काय काय ड्रामेबाजी होते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे, इंडियन आयडल हा शो असे म्हटले तर वावगे होणार नाही. आता तर खुद्द या शोचा होस्ट आदित्य नारायण (Aditya Narayan) यानेच या शोची ‘पोलखोल’ केली आहे.
होय, ‘इंडियन आयडल 12’ मध्ये पवनदीप राजन (Pawandeep Rajan ) आणि अरूणिता कांजिलाल (Arunita Kanjilal) यांचा लव्ह अँगल दाखवला जातोय. हे दोघे एकमेकांच्या प्रेमात असल्याचे सांगण्यात येतेय, पण हे सगळं खोटं असल्याचा खुलासा खुद्द आदित्यने केला आहे.
एका ताज्या मुलाखतीत आदित्यने ही कबुली दिली. पवनदीप व अरूणिताचा लव्ह अँगल बनावटी होता. त्यात काहीही सत्य नाही. दोघेही मुळीच रिलेशनशिपमध्ये नाहीत, असे आदित्यने कबुल केले.

मग हे कशासाठी?
पवनदीप व अरूणिताचा खोटा लव्ह अँगल का? असे विचारले असता, यामागे निव्वळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हा एकच उद्देश असल्याचे तो म्हणाला.  एक एपिसोड 90 मिनिटांचा असतो. त्या 90 मिनिटात स्पर्धकांच्या परफॉर्मन्सशिवाय आणखी काय काय दाखवले जाईल, हे ठरवले जाते. प्रेक्षकांनी कंटाळून  चॅनल बदलू नये आणि त्यांचे मनोरंजन व्हावे, या एकाच हेतूने काही गोष्टी दाखवल्या जातात.  पवनदीप आणि अरुणिता यांनी एकमेकांबद्दल छेडणे हा मस्तीचा भाग असतो. ते कोणीही सीरिअस घेत नाही. फक्त एन्जॉय करतात, असे आदित्य म्हणाला.
मालिकेतील कलाकार एक सीन शूट केल्यानंतर लगेच त्यांच्या ख-या पार्टनरकडे जातात. तर रिअ‍ॅलिटी शो बद्दल एवढे प्रश्न का? असा सवालही त्याने केला.

प्रेक्षकांना केली विनंती
मी प्रेक्षकांना विनंती करेन की, त्यांनी फक्त शोच्या स्पर्धकांच्या कामगिरीवर लक्ष केंद्रीत करावं. आम्ही सर्वजण आपआपल्या भूमिका साकारत आहोत. स्टेजवरच्या आणि प्रेक्षकांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा फक्त रिअ‍ॅलिटीवर फोकस करा आणि उर्वरित गोष्टी फक्त एन्जॉय करा, असेही आदित्य यावेळी म्हणाला.
 

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: indian idol 12 aditya narayan accept pawandeep rajan and arunita kanjilal love angel is fake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app