“I left a job offer from America to pursue a career in acting”, reveals Shakti Anand | म्हणून अमेरिकेत नोकरीसाठी गेला नाही शक्ति आनंद
म्हणून अमेरिकेत नोकरीसाठी गेला नाही शक्ति आनंद

कलर्सच्या किचन चँपियन्स शो वर आपले आवडते टेलिव्हिजन स्टारच्या वेगवेगळा छटा आपण पाहिल्या आहेत. त्यांच्या जीवनात डोकावून बघण्याची संधी प्रेक्षकांना देत असताना आगामी एपिसोड मध्ये कुकींगचे आव्हान स्विकारणार आहे शक्ती आनंद आणि शरद केळकर, त्यांच्या सोबत असणार आहेत त्यांच्या पत्नी, सई देवधर आणि किर्ती केळकर.

यावेळी शक्ती आनंदने सांगितले की तो एक फार्मास्युटिकल इंजिनियर आहे आणि हे माहित नसल्यामुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले. यावेळी शोचा होस्ट अर्जुनने त्याला कुतुहलाने विचारले की इंजिनियरींग व्यवसाय म्हणून न करता त्याने अभिनयाची निवड का केली.

अर्जुनला उत्तर देताना, शक्ती आनंद म्हणाला, “मी एक फार्मास्युटिकल इंजिनियर आहे आणि मी त्या क्षेत्रात काम सुध्दा केलेले आहे. पण कॉलेज मध्ये असताना मला रंगभूमीवर काम करण्यात स्वारस्य होते आणि मी अनेक नाटकात काम केलेले आहे. त्यानंतर एका क्षणी मी ऑडिशन द्यायला सुरूवात केली, तेव्हाही मी एक इंजिनियर म्हणून काम करत होतोच. जेव्हा माझ्या कंपनीने मला अमेरिकेला कामासाठी जाण्याची ऑफर दिली, त्याच वेळी मला मुंबईतून फोन आला की मी एका शो साठी निवडलो गेलो आहे. माझ्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची सोनेरी संधी मला मिळाली होती त्यामुळे मी अमेरिकेला न जाण्याचा निर्णय घेतला आणि त्या ऐवजी मी मुंबईला आलो.”
 


Web Title: “I left a job offer from America to pursue a career in acting”, reveals Shakti Anand
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.