This is how Babita met Jethalal in 'Taraq Mehta', the honorarium she takes for one episode | 'तारक मेहता'मधील जेठालालला अशी भेटली होती बबीता, एका एपिसोडसाठी घेते इतके मानधन

'तारक मेहता'मधील जेठालालला अशी भेटली होती बबीता, एका एपिसोडसाठी घेते इतके मानधन

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा बऱ्याच वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे. 28 जुलैला मालिकेला 12 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि नुकतेच या मालिकेने 3000 एपिसोड्स पूर्ण केले आहेत. 12 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे आणि आजही चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. मालिकेत दिलीप जोशी आणि दिशा वकानी म्हणजेच दयाबेन आणि जेठालाल यांचे वाद प्रेक्षकांना भावतात.जेठा आणि बबीताचा लपूनछपून केलेल्या रोमांसचा प्रत्येक जण फॅन आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत बबीताच्या भूमिकेतून अभिनेत्री मुनमुन दत्ता घराघरात लोकप्रिय झाली. मुनमुन दत्ताचे नाव दिलीप जोशीने निर्मात्यांना सुचविले होते. त्यानंतर निर्मात्यांनी मुनमुनची बबीताच्या भूमिकेसाठी निवड केली. लोकांना बबीता आणि जेठालालमधील रोमांस खूप भावतो. बबीताच्या भूमिकेमुळे मुनमुन दत्ताच्या फॅन फॉलोव्हिंग खूप वाढले आहे. 


मालिकेत जेठालाल मुनमुनला बबीताजी म्हणून हाक मारतात पण कॅमेरा ऑफ होताच मुनमुन दिलीप जोशीला सर म्हणून हाक मारते. कारण ते एकमेकांचा खूप आदर करतात. विशेष म्हणजे दिलीप जोशी आणि मूनमून दत्ता यापूर्वी एका कॉमेडी शोमध्ये दिसले आहेत. हम सब बाराती मालिकेत दिलीप जोशीने नाथू मेहताची भूमिका केली होती तर मुनमुन मीठीच्या भूमिकेत दिसली होती. हा शो 2004 साली प्रसारीत झाला होता.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुनमुन दत्ता तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेसाठी प्रत्येक भागासाठी 35 ते 50 हजार रुपये मानधन मिळते. मुनमुन तारक मेहता शिवाय चित्रपटातही झळकली आहे. 'मुंबई एक्सप्रेस' नामक चित्रपटात मुनमुव हासनच्या भूमिकेत दिसली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: This is how Babita met Jethalal in 'Taraq Mehta', the honorarium she takes for one episode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.