कांद्यांचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यामुळे सगळेजण हैराण झाले आहेत. सामान्य माणूसच नाही तर सेलिब्रेटीदेखील वाढत्या कांद्याच्या दरामुळे त्रस्त झाले आहेत. त्यात आता हिना खानने तिच्या वडिलांचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत तिचे वडील कांदे लॉकरमध्ये लपवून ठेवण्याबद्दल सांगत आहेत. 

हिना खानने इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे आहे. या व्हिडिओत हिनाचे वडील कांद्याची टोपलीसोबत दिसत आहेत आणि तिला ही टोपली बँकेच्या लॉकरमध्ये ठेवायला सांगत आहे.

हिनाचे वडील बोलत आहेत की, हे बँकेचे लॉकरमध्ये ठेवा. हा खूप किमती खजिना आहे यावेळी. या खजिन्याला सुरक्षित ठेवा. हे खूप अमुल्य आहे. या व्हिडिओत हिना खानचे वडील कांदे घरात घेऊन जाताना दिसत आहेत.


 हिनाने वडिलांच्या या हरकतीला क्यूट म्हटलं आहे.

 
हिना खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर बिग बॉसच्या ११व्या सीझनमध्ये सहभागी झाल्यानंतर हिनाकडे प्रोजेक्टच्या रांगा लागल्या.

हिना खान स्मार्टफोन, हॅक्ड, लाइन्स, सोलमेट,विशलिस्ट व द कंट्री ऑफ ब्लाइंड हे तिचे आगामी प्रोजेक्ट आहेत. ती डॅमेज्ड २मध्ये गौरी बत्राची भूमिका साकारताना दिसणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Hina Khan father told her to hide onions in bank locker price hike funny video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.