नेहा कक्कर  तिचे ब्रेकअप झाल्यापासून वेगवेगळ्या कारणांमुळे सोशल मीडियावर  चर्चेत असायची.  ब्रेकअपनंतर नेहा काहीकाळ डिप्रेशनमध्ये गेली होती. इंडियन आयडॉल 10 च्या सेटवर एक्स बॉयफ्रेन्ड हिमांश कोहलीच्या आठवणीने ढसाढसा रडली होती. नेहाने सोशल मीडियावर अनेकवेळा आपल्या ब्रेकअपबाबत वक्तव्य केली होती मात्र हिमांशने यावर कधीच काही बोलला नाही. इंडिया टिव्हीच्या रिपोर्टनुसार पहिल्यांदा नेहासोबतच्या ब्रेकअपवर हिमांश बोलला आहे. 


हिमांश म्हणाला, ब्रेकअप होऊन आता जवळपास एक वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे आणि मला मागे वळून बघण्याची गरज नाही वाटतत. जे व्हायचे होते ते घडून गेले आहे. मी आता त्याला नाही बदलू शकतं. मी आज ही नेहाचा  आदर करतो. ती एक खूप चांगली व्यक्ती आणि कलाकार आहे. मला आशा आहे की, आयुष्यात तिला जे हवंय ते सगळं मिळू देत.   


 हिमांश कोहली हमसे है लाईफ या टीव्ही सिरीयलमुळे चर्चेत आला होता. यानंतर त्याने 'यारियां' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. रिपोर्टनुसार लवकरच हिमांश सिनेमा आणि वेब सीरीजमध्ये दिसण्याची शक्यता आहे. 


काही दिवसांपूर्वी नेहाबाबत बोलायचे झाले तर तिचे नाव  इंडियन आयडॉल 10 मधील स्पर्धक विभोर पाराशरसोबत जोडण्यात आले होते. विभोर आणि नेहा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना विभोर चांगलाच खवळला होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Himansh kohli opens up on breakup with neha kakkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.