स्टाईल मै रेहने का, हार्दिक जोशीचा नवीन लूक चर्चेत, नव्या भूमिकेसाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 05:19 PM2021-06-11T17:19:28+5:302021-06-11T17:22:02+5:30

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेमुळे अभिनेता हार्दिक जोशी राणा बनत घराघरात पोहचला. मालिका बंद झाल्यानंतर रसिकांचा लाडका राणा दा सध्या काय करतोय याविषयी जाणून घेण्याचीही रसिकांची उत्सुकता असते.

Hardeek Joshi Changed and stylish look attracts all | स्टाईल मै रेहने का, हार्दिक जोशीचा नवीन लूक चर्चेत, नव्या भूमिकेसाठी सज्ज

स्टाईल मै रेहने का, हार्दिक जोशीचा नवीन लूक चर्चेत, नव्या भूमिकेसाठी सज्ज

googlenewsNext

मेकओव्हर, लूक बदलणे, स्टाइल स्टेटमेंटमध्ये बदल अशा गोष्टी अनेकदा फक्त अभिनेत्रींबाबत ऐकायला मिळायच्या.मात्र आता काळ बदललाय आणि स्पर्धाही वाढलीय. त्यामुळे या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेन तर काळानुरुप बदलायला हवं ही बाब आता अभिनेत्यांच्याही लक्षात येऊ लागली आहे. त्यामुळे सध्याचे अभिनेते मात्र लूक्स आणि स्टाइलबाबत फारच सजग झाले आहेत.सध्याची नव्या कलाकारांची पीढी अभिनया इतकंच त्यांच्या लूकवरही प्रचंड मेहनत घेत असते. याचेच ताजे उदाहरण म्हणजे अभिनेता हार्दिक जोशी.

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेमुळे अभिनेता हार्दिक जोशी राणा बनत घराघरात पोहचला. मालिका बंद झाल्यानंतर रसिकांचा लाडका राणा दा सध्या काय करतोय याविषयी जाणून घेण्याचीही रसिकांची उत्सुकता असते. तुर्तास तो त्याच्या लूकमुळे चर्चेत आला आहे.  बदललेला लूक. रॉकिंग अंदाज, स्टाइल, हटके हेअर स्टाइल यामुळे हार्दिक सध्या सा-यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्याच्या या लूकवर बरीच चर्चाही रंगली आहे. हार्दिकने त्याचा फोटो शेअर करत त्याला कॅप्शनही दिली आहे. यावरुन नवीन भूमिकेत तो लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे.

नुकतेच हार्दिने आशुतोष गोवारिक यांचीही भेट घेतली होती. दोघांचा भेटीचा फोटोही त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता. हा फोटो पाहून मात्र त्याच्या भूमिकेविषयी चर्चा जास्त रंगल्या होत्या. हार्दिक जोशीही बॉलिवूडमध्ये झळकणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळल्या.

हार्दिक आणि आशुतोष यांच्या भेटीमागचं कारण समोर आले नसले तरीही आगामी काळात हार्दिक बॉलिवूडमध्ये झळकल्यास आश्चर्य वाटायला नको.हार्दिकचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे लवकरच नवीन भूमिकेत पाहण्यासाठी रसिक आतुर आहे हे मात्र नक्की.

Web Title: Hardeek Joshi Changed and stylish look attracts all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.