'Gopi Bahu' Devolina Bhattacharjee will get engaged soon | 'गोपी बहू' देवोलिना भट्टाचार्जी लवकरच अडकणार लग्नबेडीत

'गोपी बहू' देवोलिना भट्टाचार्जी लवकरच अडकणार लग्नबेडीत

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका साथ निभाना साथियामधील गोपी बहु अर्थात देवोलीना भट्टाचार्जी लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. तिने एका मुलाखती दरम्यान याचा खुलासा केला आहे. देवोलीनाने मुलाखतीत सांगितले की, मला माझ्या आयुष्यातील काही गोष्टी शेअर करायला आवडत नाहीत. त्यामुळे माझ्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव मी तुम्हाला सांगणार नाही पण मी पुढच्या वर्षी सर्व काही ठिक असेल तर लग्न करणार आहे. माझं मत अस आहे की, कोणतेही नाते टिकवण्यासाठी समजून घेण्याची गरज असते. 

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत देवोलिना भट्टाचार्जीने सांगितले की, बिग बॉसमध्ये एन्ट्री करण्याआधी विचार केला होता की आम्ही आमचे नाते पुढे घेऊन जाणार आहे. मी माझ्या खासगी आयुष्याबद्दल सर्वांसमोर बोलायचा आवडत नाही. माझे असे मत आहे की प्रेमासोबत नात्यात एक अंडरस्टॅण्डिंगही असणे गरजेचे आहे. वाईट नजर सारख्या गोष्टीवर माझा विश्वास आहे. त्यामुळे मी जास्त डिटेल्स शेअर करणार नाही. ती पुढे म्हणाली की, जर सर्व काही ठीक असेल तर २०२२ साली लग्न करेन.
देवोलीना बिग बॉस १४ मध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी चाहत्यांना त्यांच्या गोपी बहुचा एक वेगळा अवतार पहायला मिळाला होता. 'बिग बॉसच्या घरात अर्शी खान आणि देवोलीना भट्टाचार्य यांच्या जोरदार वाद झाला होता. या वादामध्ये देवोलीना भट्टाचार्यने बिग बॉसच्या घरातील अनेक वस्तूंची तोडफोड केली होती, देवोलीनाने अर्शीच्या हातातील अन्न फेकून देते अर्शीला शिवीगाळही करताना दिसली होती.

देवोलीना भट्टाचार्यचे हे रूप बघून घरातील इतर सदस्य चकीत झाले होते. अली गोनीने तिला समजवण्याचा प्रयत्न केला होता. देवोलीना जोरजोरात ओरडत म्हणाली होती की, अर्शी माझ्या घरच्यांविषयी बोलली आहे. देवोलीना तिचा मोर्चा बाथरूमकडे वळवला होता आणि तेथेही काही वस्तूंची मोडतोड करताना दिसली होती.

देवोलीना अर्शीला शिव्या देताना विचित्र हातवारे करताना दिसली होती. गोपी बहु म्हणून प्रत्येक घरामध्ये पोहचलेल्या देवोलीना भट्टाचार्यचे हे रूप पाहून प्रेक्षकांना धक्काच बसला आहे. अर्शीसोबतच्या भांडणामध्ये देवोलीना भट्टाचार्यने सर्व सीमा पार केल्या होत्या.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 'Gopi Bahu' Devolina Bhattacharjee will get engaged soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.