Bigg Boss Marathi 3: शोमुळे गायत्री दातारला मोठा फटका, सहन करावा लागतो मोठा तोटा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 11:40 AM2021-10-16T11:40:02+5:302021-10-16T11:46:33+5:30

छोट्या पडद्यावर सध्या तुला पाहते रे ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. मालिकेतून गायत्री दातार घराघरात पोहचली होती.  या ...

Gayatri datar Facing Huge Loss, Due to bigg Boss Marathi 3 she lost big Marathi Movie Offer | Bigg Boss Marathi 3: शोमुळे गायत्री दातारला मोठा फटका, सहन करावा लागतो मोठा तोटा

Bigg Boss Marathi 3: शोमुळे गायत्री दातारला मोठा फटका, सहन करावा लागतो मोठा तोटा

Next

छोट्या पडद्यावर सध्या तुला पाहते रे ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. मालिकेतून गायत्री दातार घराघरात पोहचली होती.  या मालिकेत अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री गायत्री दातार यांची केमिस्ट्री रसिकांना चांगली भावली होती. मालिकेमुळे प्रसिद्धीच्याझोतात आलेली गायत्रीला या मालिकेनंतर खूप चांगल्या संधी मिळायला सुरुवात झाल्या होत्या. नाटकातही तिने काम केले होता. यानंतर सर्वात लोकप्रिय असेला विनोदी कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' या शोमध्ये सुद्धा ती झळकली होती. या नंतर थेट बिग बॉस मराठी ३ मध्ये ती आता झळकत आहे.

 

बिग बॉसमध्ये सहभागी होण्याचे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. अगदी त्याच प्रमाणे गायत्रीचेही असावे. या शोची ऑफर गायत्रीने स्विकारली खरी पण त्यामुळे तिला प्रचंड मोठा तोटा सहन करावा लागत आहे. छोटा पडदा गाजवल्यानंतर गायत्री आता रुपेरी पडद्यावर झळकणार होती. मात्र बिग बॉसमुळे सिनेमात काम करण्याची मिळालेली ऑफर तिच्या हातून निसटल्याचे समजतंय. 

बिग बॉसच्या घरात एंट्री घेण्यापूर्वी “बाबू” या मराठी सिनेमाची गायत्री दातारला ऑफर मिळाली होती.अभिनेता अंकित मोहन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अंकित मोहन सोबत अभिनेत्री गायत्री दातार आणि रुचिरा जाधव झळकणार होत्या मात्र गायत्री बिग बॉसच्या घरात असल्याने ती ह्या चित्रपटाचे शूटिंग करू शकत नाही. त्यामुळे बाबू चित्रपटात गायत्रीच्या जागी आता अभिनेत्री नेहा महाजन हिची वर्णी लागली आहे.

काही दिवसांपूर्वीच बाबू या सिनेमाचे शूटिंग सुरू करण्यात आले आहे .या सिनेमाचे नाव जाहीर झाले त्यावेळी गायत्री दातार, अंकित मोहन, रुचिरा जाधव यांनी हजेरी लावली होती. मात्र बिग बॉसमुळे गायत्रीला या सिनेमात काम करणे शक्य नसल्याने गायत्रीच्या जागी आता नेहा महाजन सिनेमात झळकणार आहे. 

तुर्तास बिग बॉस मराठी ३ची चांगलीच चर्चा सुरु आहे. घरात सहभागी झालेले स्पर्धकही चांगलेच रसिकांचे मनोरंजन करताना दिसत आहेत. अभिनेत्री म्हणून गायत्री दातारला चाहत्यांनी पाहिलेच आहे.मा रिअल लाईफमध्ये गायत्री कशी आहे हे जाणून घेण्याची संधी बिग बॉस शोमुळे तिच्या चाहत्यांना मिळाली आहे. बिग बॉसमध्ये गायत्रीही चांगलीच खेळी खेळताना दिसत आहे. 

Web Title: Gayatri datar Facing Huge Loss, Due to bigg Boss Marathi 3 she lost big Marathi Movie Offer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app