Examiner became emotional after hearing the voice of Maharashtrian Yuvraj, cleaning on the set of 'Indian Idol' | जिंकलस भावा! मराठमोळ्या युवराजचा आवाज ऐकून परीक्षक झाले भावूक, 'इंडियन आयडल'च्या सेटवर करायचा साफसफाई

जिंकलस भावा! मराठमोळ्या युवराजचा आवाज ऐकून परीक्षक झाले भावूक, 'इंडियन आयडल'च्या सेटवर करायचा साफसफाई

टॅलेंट ही अशी गोष्ट आहे कोणामध्ये कुठले टॅलेंट दडलेले असेल हे सांगता येत नाही. असेच काहीसे इंडियन आयडलच्या सेटवर घडले आहे. लवकरच सिंगिंग रिएलिटी शो इंडियन आयडल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाचा सीझन प्रदर्शित होण्यापूर्वी चर्चेत आला आहे. सोनी टीव्हीने इंडियन आयडलचा प्रोमो नुकताच शेअर केला आहे. यात एक स्पर्धक असा आला ज्याने त्याच सेटवर साफसफाई करण्याचे काम केले होते. त्याचा आवाज, गाणे ऐकून परीक्षक भावूक झाले आहेत.

नुकताच सोनी टीव्हीने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर इंडियन आयडलचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये युवराज मेढे हा स्पर्धक मराठी गाणे गाताना दिसत आहे. त्याचा आवाज ऐकून परीक्षक विशाल दादलानी, नेहा कक्कड आणि हिमेश रेशमिया हे भावूक झाले आहेत.


मराठमोळ्या युवराजने गाणे गायल्यानंतर सांगितले की तो सेटवर साफसफाईचे काम करत होता. सेटवर साफसफाई करत असताना तो गाणे गायला शिकला. जेव्हा परिक्षक स्पर्धकांना त्यांच्या चुका सांगयचे तेव्हा युवराज त्याकडे लक्ष द्यायचा आणि त्या चुका त्याच्याकडून होणार नाहीत याची काळजी घ्यायचा. युवराजचे असे बोलणे ऐकून परिक्षक चकीत झाले.


यंदाच्या इंडियन आयडलमध्ये विशाल दादलानी, नेहा कक्कड आणि हिमेश रेशमिया हे परिक्षक म्हणून असणार आहेत. उद्यापासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Examiner became emotional after hearing the voice of Maharashtrian Yuvraj, cleaning on the set of 'Indian Idol'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.