त्यांची मेहनत का वाया घालवता? ‘Bigg Boss Marathi 3’च्या स्पर्धकांवर भडकला पराग कान्हेरे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 03:18 PM2021-10-18T15:18:10+5:302021-10-18T15:19:05+5:30

Bigg Boss Marathi 3, Parag Kanhere Post : हे स्पर्धक निकाल न देता टास्क वाया का घालवत आहेत? त्यामुळे त्यांची सर्व मेहनत वाया जात आहे, अशा शब्दांत पराग कान्हेरेने आपला संताप व्यक्त केला आहे.

ex-contestant of bigg boss marathi parag kanhere slams bigg boss marathi 3 contestants | त्यांची मेहनत का वाया घालवता? ‘Bigg Boss Marathi 3’च्या स्पर्धकांवर भडकला पराग कान्हेरे

त्यांची मेहनत का वाया घालवता? ‘Bigg Boss Marathi 3’च्या स्पर्धकांवर भडकला पराग कान्हेरे

Next
ठळक मुद्देमाझ्या या विधानांसाठी मला ट्रोल केले जाईल. पण विशाल हा माझा आवडता स्पर्धक असूनही, मला त्याच्या चुकांवर टीका करण्याचे स्वातंत्र्य आहे, असेही त्याने आपल्या या पोस्टमध्ये लिहिले आहे.

बिग बॉस मराठी 3’ (Bigg Boss Marathi 3) हा शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. काहीच आठवड्यात प्रेक्षकांनी हा शो डोक्यावर घेतलाय. अशात सोशल मीडियावर चर्चा तर होणार. तूर्तास चर्चा आहे ती बिग बॉस मराठीच्या घरातील टास्कची. गेल्या दोन-तीन आठवड्यात अनेक टास्क झालेत आणि यापैकी अनेक टास्क वाया गेलेत. कॅप्टनसी टास्कही घरातील सदस्यांनी वाया घालवला. आता यामुळे चाहत्यांची निराशा होणे स्वाभाविक आहे. ‘ बिग बॉस मराठी’चा माजी स्पर्धक पराग कान्हेरे (Parag Kanhere) हाही या प्रकारामुळे नाराज आहे आणि सोशल मीडियावर याबद्दलचा संताप त्याने व्यक्त केला आहे.   
 बिग बॉसची प्रॉडक्शन टीम हा शो अधिक लोकप्रिय करण्यासाठी बराच प्रयत्न करत आहे. मला माहित आहे की ते ब्रेकशिवाय सुमारे १६ तास काम करतात. पण हे स्पर्धक निकाल न देता टास्क वाया का घालवत आहेत? त्यामुळे त्यांची सर्व मेहनत वाया जात आहे, अशा शब्दांत त्याने आपला संताप व्यक्त केला आहे.

पराग कान्हेरेची पोस्ट 

‘बिग बॉसची प्रॉडक्शन टीम हा शो अधिक लोकप्रिय करण्यासाठी बराच प्रयत्न करत आहे. मला माहित आहे की ते ब्रेकशिवाय सुमारे १६ तास काम करतात. पण हे स्पर्धक निकाल न देता टास्क वाया का घालवत आहेत? त्यामुळे त्यांची सर्व मेहनत वाया जात आहे. सोनाली हुशारीने खेळत आहे. विशाल विनाकारण तिच्याशी उद्धट वागू लागला आहे, तो स्वत:च्याच हितचिंतकांचे ऐकत नाही. सहानुभूती कार्ड प्रत्येकवेळी खेळलं जातं. ग्लॅमर ग्रुप आक्रमकपणे खेळत आहे, पण विशाल, विकास, मीनल आणि सोनालीने नीतीमत्तेसह खेळ खेळावा. कारण ते महाराष्ट्राचे आवडते स्पर्धक आहेत. विशालला कालच टास्क सहज जिंकता आला असता, कारण तृप्ती ताई त्यांच्या बाजूने होत्या. तो योग्य नियोजन करून टास्क खेळू शकला असता. सोबतच मीनल आणि सोनालीला विशालच्या बॅचेसचे संरक्षण करण्याची संधी मिळायला हवी होती. त्यामुळे निश्चितच टास्कचा निकाल चांगला मिळाला असता आणि विशाल कॅप्टन झाला असता,’ अशी पोस्ट परागने लिहिली आहे.
‘मला माहिती आहे माझ्या या विधानांसाठी मला ट्रोल केले जाईल. पण विशाल हा माझा आवडता स्पर्धक असूनही, मला त्याच्या चुकांवर टीका करण्याचे स्वातंत्र्य आहे. कारण तुमच्या सर्वांप्रमाणेच मी देखील प्रेक्षक म्हणून बिग बॉस मराठी पाहत आहे. ते पाहण्यासाठी मी माझा मौल्यवान वेळ घालवतो. या सर्वांमध्ये मी सेलिब्रिटी नाही. प्रत्येकाला माझ्या मतांचा आणि पोस्टचा विरोध करण्याचा अधिकार आहे. मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो आणि नेहमीच करीन,’ असेही त्याने आपल्या या पोस्टमध्ये लिहिले आहे.

Web Title: ex-contestant of bigg boss marathi parag kanhere slams bigg boss marathi 3 contestants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app