छोट्या पडद्यावरील अभिनेत्री ईशा सिंग इश्क सुभान अल्लाह या मालिकेत मुख्य भूमिका साकारीत आहे. या मालिकेच्या शूटिंगदरम्यान ईशाची अचानक तब्येत बिघडली. त्यानंतर चेकअप केल्यानंतर तिला डेंग्यु झाल्याचं निदान करण्यात आलं.

ईशा सिंगने एका वेबसाईटशी बोलताना सांगितलं की, हो मला डेंग्यु झाला आहे. त्यामुळे सध्या मी रेस्ट करत आहे. इतकंच नाही तर मी बेडवरूनदेखील उठू शकत नाही आहे. 


१२ सप्टेंबरला ईशाची मालिकेच्या सेटवर अचानक तब्येत बिघडली. ईशा इश्क सुभान अल्लाह मालिकेचं शूटिंग मीरा रोड येथे करत होती. अचानक दुपारी चित्रीकरणादरम्यान तिला बरं वाटत नसल्याचं जाणवलं. त्यानंतर ती सेटवरून घरी गेली. तिच्या तब्येतीत अजिबात सुधारणा झाली नाही.


ईशाशी निगडीत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिची तब्येत ठीक नसतानाही ती रविवारी सेटवर आली होती. ती तिची कमिटमेंट पूर्ण करण्यासाठी मालिकेच्या सेटवर आली होती. मात्र प्रोडक्शन टीमने तिला सुट्टी दिली. तिला जोपर्यंत बरे वाटत नाही तोपर्यंत ती शूटिंगसाठी येणार नाही.


ईशा सिंग लवकरच इश्क सुभान अल्लाह मालिकेचा निरोप घेणार आहे. ३० सप्टेंबरला तिचं शेवटचं शूटिंग होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ईशाला बॉलिवूडमध्ये काम करायचं असल्यामुळे ती मालिका सोडत आहे. तिला एका मोठ्या बॅनरच्या चित्रपटाची ऑफर मिळाली आहे. अद्याप याबाबत तिने कोणताही खुलासा केलेला नाही.

Web Title: eisha singh health down ishq subhan allah actress diagnosed with dengue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.