ठळक मुद्देअनसने सध्या अभिनयक्षेत्रातून ब्रेक घेतला असून तो त्याच्या गावी चंडिगढला राहात आहे. तिथे तो शेती व्यवसाय करत आहे.

अनस रशिदने दिया और बाती हम या मालिकेत काम केले होते. या मालिकेत त्याने साकारलेली सुरज ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या मालिकेचा दुसरा सिझन असलेल्या तू सुरज में सांझ पिया की या मालिकेत देखील अनस झळकला होता. तो गेल्या दोन वर्षांपासून अभिनयक्षेत्रापासून दूर आहे. तो आता काय करतो हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसणार आहे. अनसने सध्या अभिनयक्षेत्रातून ब्रेक घेतला असून तो त्याच्या गावी चंडिगढला राहात आहे. तिथे तो शेती व्यवसाय करत आहे.

दिया और बाती या मालिकेने अनसला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेत तो एका मिठाईवाल्याच्या भूमिकेत दिसला होता. तो या मालिकेतील त्याच्या व्यक्तिरेखेप्रमाणेच खऱ्या आयुष्यात देखील अतिशय साधा असून त्याला एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन जगायला आवडते. अनस अभिनयक्षेत्रापासून दूर का आहे याविषयी त्याने एका मुलाखतीत सांगितले होते. त्याने या मुलाखतीत म्हटले होते की, मी पाच वर्षांसाठी किंवा त्याहीपेक्षा अधिक काळासाठी अभिनयक्षेत्रातून ब्रेक घेत आहे. मी अभिनयक्षेत्रात परत कधी येईन हे मला माहीत नाही. पण सध्या तरी अभिनयक्षेत्रात येण्याचा माझा विचार नाहीये. माझ्या या निर्णयामुळे माझ्या कुटुंबियातील मंडळी प्रचंड खूश आहेत. मी सध्या शेती करत असून देवाच्या कृपेने पीकं देखील खूप चांगली येत आहेत. मी पूर्वी अभिनयक्षेत्रात नसताना देखील हेच काम करत होतो. मला ट्रॅक्टर चालवायला तर खूप आवडतो. 

अनसने त्याच्यापेक्षा वयाने 14 वर्षं लहान असलेल्या मुलीसोबत काही महिन्यांपूर्वी लग्न केले. त्याचे अरेंज्ड मॅरेज असून त्याच्या पत्नीचे नाव हिना आहे. हिना ही केवळ 24 वर्षांची असून ती लग्नाच्या सहा वर्षं आधीपासून चंडिगडमध्येच राहाते.

Web Title: 'Diya Aur Baati Hum' fame Anas Rashid becomes farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.