Dharmendra raps with Badshah in Kanpur Waale Khuranas Show | धर्मेन्द्र यांनी बादशाहसोबत केले रॅप
धर्मेन्द्र यांनी बादशाहसोबत केले रॅप

स्टार प्लस वाहिनीवरील 'कानपुर वाले खुराणाज्‌' विनोदी शोमध्ये धर्मेन्द्र आणि बादशाह हे सेलेब्रिटी अतिथी म्हणून आले होते. तेव्हा प्रेक्षकांनी खुद्द धर्मेन्द्र यांना किंग ऑफ रॅप बादशाहसोबत आपले रॅपिंग कौशल्य दाखवले.


सूत्रांच्या माहितीनुसार, धर्मेन्द्र यांनी 'कानपुर वाले खुराणाज्' शोमध्ये रॅपिंग करून सर्वांना थक्क केले. धर्मेन्द्र यांच्यासोबत बादशाहसुद्धा सामील झाला आणि प्रेक्षकांनी सेट अक्षरशः डोक्यावर घेतला. त्यांचा परफॉर्मन्स पाहून सगळेच अचंबित झाले होते.
असे काही तरी आहे का की जे धर्मेन्द्र करू शकत नाहीत? त्यांनी पुन्हा पुन्हा काळासोबत प्रगल्भ झाल्याचे दाखवून दिले आहे आणि यावेळेस स्टार प्लसवरील 'कानपुर वाले खुराणाज्‌'मधील प्रेक्षकांचे छान मनोरंजन केले. 
 'कानपुर वाले खुराणाज्‌'मध्ये कुणाल खेमू कॉमेडी शोमॅन सुनिल ग्रोव्हरसोबत दिसून येईल आणि प्रेक्षकांचे निश्चितपणे तुफान मनोरंजन होईल. अतिशय विनोदी अशा स्टार प्लसवरील 'कानपुर वाले खुराणाज्‌'मध्ये कुणाल खेमू टेलिव्हिजनवर सूत्रसंचालकाच्या रूपात पदार्पण करणार आहे.  ह्या शोमध्ये प्रथम सेलेब्रिटी अतिथी म्हणून बॉलीवूडमधील महान अभिनेता धर्मेद्र आणि किंग ऑफ रॅप बादशाह उपस्थित राहणार आहे. त्याच्यासोबत ह्या शोमध्ये अलि असगर, उपासना सिंग आणि सुगंधा मिश्रासुद्धा दिसणार आहेत. 'कानपुर वाले खुराणाज्‌' हा शो लवकरच स्टार प्लसवर दाखल होणार आहे. फराह खानला कॉमेडी करताना छोट्या पडद्यावर पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

Web Title: Dharmendra raps with Badshah in Kanpur Waale Khuranas Show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.