Devoleena Bhattacharjee Slammed Troller Who Compared Her With Rhea Chakraborty | "खबरदार माझी तुलना रिया चक्रवर्ती बरोबर केली तर", या अभिनेत्रीने नेटीझन्सना सुनावले खडे बोल

"खबरदार माझी तुलना रिया चक्रवर्ती बरोबर केली तर", या अभिनेत्रीने नेटीझन्सना सुनावले खडे बोल

टीव्ही सीरियल 'साथ निभाना साथिया' फेम गोपी बहू अर्थात देवोलीना भट्टाचार्जी सध्या खूप चर्चेत आहे. त्यातही या मालिकेचा दुसरा सिझन लकरच रसिकांच्या भेटीला येणार म्हटल्यावर पुन्हा एकदा रसिकांच्या मनोरंजनासाठी कलाकारमंडळीही सज्ज झाले आहेत. अशातच सुशांतच्या निधनानंतर वेगवेगळे कलाकार यावर आपली प्रतिक्रीया मांडत आहेत. मध्यंतरी अंकिताने सुशांतला न्याय मिळावा यासंदर्भात एक भली मोठी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. अंकिताला सपोर्ट करण्यासाठी अनेक कलाकारांनीही आपल्या प्रतिक्रीया दिल्या होत्या. 


देबोलिनानेही अंकिताला सपोर्ट केला होता. मात्र नेटीझन्सने देबोलिनाना ट्रोल करायला सुरूवात केली. तिचा जुना वादावर बोलत तिची तुलना रिया चक्रवर्तीसह केली. नेटीझन्स रियाची तुलना तिच्यासह करत असल्याचे बघत देबोलिनानेही गप्प न राहता चांगलेच फटकारले.

 

यात तिने सांगितले की, मी कधीच ड्रग्सच्या आहारी गेली नाही. नाही कोणाचा पैशासाठी दुसरुपयोग केला आहे. मी कोणाचाही माझ्या फायद्यासाठी उपयोग करून घेतला नाही. ना कधी कोणाची बदनामी केली. असे सांगत तिने आपला संताप व्यक्त केला आहे. 

देबोलिना भट्टाचार्जीविरोधात सायबर क्राईमकडे तक्रार झाली होती दाखल

देवोलिना कायदेशीर कारवाईमध्ये फसल्याची माहिती समोर आली होती. टीव्ही अभिनेता आणि 'मुझसे शादी करोगे' रिअलीटी शोचा स्पर्धक मयुर वर्मानं देवोलिनाच्या विरोधात सायबर क्राइमची तक्रार दाखल केली होती. मयुरनं आरोप केला होता की देबोलिना त्याची प्रतिमा खराब करण्याचा आणि त्याला अपमानित करण्याचा प्रयत्न करत आहे. मयुरनं ट्वीटरवरून याची माहिती दिली होती.दुसरीकडे देवोलिनाननं मयुरच्या या तक्रारीला एक पब्लिसिटी स्टंट म्हटलं होतं. ती म्हणाली, मी कोणत्याही मयुर वर्माला ओळखत नाही. मला माहित नाही तो माझं नाव का घेत आहे. हा एक पब्लिसिटी स्टंट असू शकतो. 

 ८ वर्षानंतर इतकी ग्लॅमर दिसू लागली देबोलिना बॅनर्जी

देबोलिना भट्टाटार्जीही चर्चेत आली आहे. मालिकेच्या ८ वर्षानंतर कमालीचा मेकओव्हर झाल्याचे पाहायला मिळत आहे. पूर्वीपेक्षा अधिक सुंदर आणि ग्लॅमरस ती दिसू लागली आहे. रिअल लाइफमध्ये ती मनमौजी आणि धम्माल मस्ती करणारी आहे. काही दिवसांपूर्वीच तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोला फॅन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत. या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे देवोलिनाचेही फोटो काहीसे वेगळे ठरत आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Devoleena Bhattacharjee Slammed Troller Who Compared Her With Rhea Chakraborty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.