ग्लॅमर दुनियत अभिनय करायचा असेल तर हँडसम दिसण्याला तसेच फिट राहण्यालाही अधिक महत्त्व आहे. मात्र बालवीर रिटर्न्समधील देव जोशी या अभिनेत्याला फिटनेसचा वेगळाच फंडा सांगितला आहे. तो म्हणतो माझ्यासाठी फिटनेस म्‍हणजे स्‍वस्‍थ शरीर. सिक्‍स पॅक अॅब्‍स किंवा धष्‍टपुष्‍ट शरीरयष्‍टी ठेवण्‍याला मी कधीच प्राधान्‍य दिले नाही. माझ्यासाठी फिटनेस म्‍हणजे आरोग्‍यदायी जीवनशैली राखणे, ज्‍यामुळे मला प्रत्‍येक कृती उत्‍साहाने करण्‍यामध्‍ये मदत होते. मी माझ्या नित्‍यक्रमामध्‍ये आरोग्‍यदायी जीवनशैली राखण्‍याचा प्रयत्‍न करतो.

माझी आई मी तंदुरूस्‍त राहण्‍यामध्‍ये मोठी भूमिका बजावते. म्‍हणून मी माझी आई जेवणासाठी जे बनवते तेच खाण्‍याची काळजी घेतो. माझ्यासाठी आरोग्‍यदायी काय आहे, हे लक्षात घेत ती माझ्यासाठी जेवण बनवते. मी देखील योग्‍य प्रमाणात आहाराचे सेवन करतो आणि यामुळे मला आतापर्यंत तंदुरूस्‍त राहण्‍यामध्‍ये मदत झाली आहे.

संगीत हे आपले मन उत्‍साहित करण्‍यासाठी एक शक्तिशाली साधन आहे. मी दररोज सकाळी 'बालवीर रिटर्न्‍स'च्‍या सेटवर मेकअप करण्‍यासाठी बसतो, तेव्‍हा मी भावपूर्ण संगीत ऐकतो. यामुळे मला नवीन उत्‍साहपूर्ण मनाने दिवसाची सुरूवात करण्‍यामध्‍ये मदत होते. मी व्‍यायाम करतो, तेव्‍हा शांत संगीत ऐकण्‍याला प्राधान्‍य देतो. शूटिंगदरम्‍यान देखील मी गाणी गुणगुणत राहतो. ज्‍यामुळे मला तणावापासून दूर आनंदी राहण्‍यामध्‍ये मदत होते. माझ्यासाठी संगीत अत्‍यंत महत्त्वपूर्ण आहे, जे माझे तन-मन स्‍वस्‍थ ठेवण्‍यामध्‍ये मदत करते.  

Web Title: Dev Joshi from Baalveer Returns as he shares his fitness secrets-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.