'रंग माझा वेगळा'मधील दीपा खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, पाहा तिचे हे व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 07:00 AM2022-01-22T07:00:00+5:302022-01-22T07:00:00+5:30

'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) फेम दीपा उर्फ रेश्मा शिंदे (Reshma Shinde) सोशल मीडियावरील लेटेस्ट पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

Deepa from 'Rang Mazha Vegla' is very glamorous in real life, watch this video of her | 'रंग माझा वेगळा'मधील दीपा खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, पाहा तिचे हे व्हिडीओ

'रंग माझा वेगळा'मधील दीपा खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, पाहा तिचे हे व्हिडीओ

Next

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळाने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. या मालिकेतील कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. या मालिकेत दीपाची भूमिका अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने साकारली आहे. रेश्मा शिंदे सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकतेच रेश्माने इंस्टाग्रामवरील व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. रेश्मा शिंदे या व्हिडीओत खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

रेश्मा शिंदे हिने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओत तिने पिवळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि त्याच रंगाची पॅण्ट घातली आहे. तिने हा व्हिडीओ पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली गाण्यावर रेकॉर्ड केले आहे. या व्हिडीओत ती ग्लॅमरस अंदाजात दिसते आहे.


रेश्मा शिंदे मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने बऱ्याच मालिकेत काम केले आहे. रंग माझा वेगळा मालिकेत तिने साकारलेल्या दीपाच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. याशिवाय तिने नांदा सौख्यभरे, चाहूल या मालिकेत काम केले आहे. याशिवाय रेश्माने हिंदी मालिकेतही काम केले आहे. रेश्माने 'केसरी नंदन' या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. 'लालबागची राणी' या चित्रपटातही ती झळकली.

Web Title: Deepa from 'Rang Mazha Vegla' is very glamorous in real life, watch this video of her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app