लॉकडाऊन : ना बाथरूम, ना टीव्ही़... पडदे लावलेल्या बाथरूममध्ये आंघोळीला गेली अभिनेत्री 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 12:59 PM2020-04-06T12:59:43+5:302020-04-06T13:00:37+5:30

शेअर केला VIDEO

coronavirus television actress ratan rajput stuck in village due to lockdown-ram | लॉकडाऊन : ना बाथरूम, ना टीव्ही़... पडदे लावलेल्या बाथरूममध्ये आंघोळीला गेली अभिनेत्री 

लॉकडाऊन : ना बाथरूम, ना टीव्ही़... पडदे लावलेल्या बाथरूममध्ये आंघोळीला गेली अभिनेत्री 

googlenewsNext
ठळक मुद्देअगले जन्म मुझे बिटीया ही किजो, महाभारत, संतोषी माँ यांसारख्या मालिकेत रतन रजपूतने मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. सगळेच लोक आपआपल्या घरात कैद आहेत. केवळ सर्वसामान्यच नाहीत तर सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत. बॉलिवूड व टीव्हीचे स्टार्स वेगवेगळ्या पद्धतीने वेळ घरात वेळ घालवत आहेत. पण टीव्ही अभिनेत्री रतन राजपूत हिची स्थिती सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. होय, रतन एका गावात अडकून पडलीय. अशा गावात, जिथे ना टीव्ही आहे, ना आंघोळीसाठी बाथरूम.

रतनने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे. लॉकडाऊन सुरू होण्याआधी रतन तिच्या गावी केली होती. लॉकडाऊनची घोषणा झाली आणि ती गावातच अडकून पडली. आता तिने लॉकडाऊनच्या काळातील अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.

रतन राजपूत ज्या गावची आहे तिथे सोयीसुविधा कमी आहेत. अशात रतनला अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. घरी टीव्ही नसल्याने देशात आणि जगात काय घडतेय, यापासून ती अनभिज्ञ आहे.   सोशल मीडियावर तिने बाथरूमची अवस्थाही दाखवली आहे. त्यात खिडकीला एका कापडी पडद्याने झाकले आहे. रतनने कपडे धुतानाचाही एक व्हिडीओ शेअर केला आहे.
मोदींनी लॉकडाउनची घोषणा करताच घरातून पळत जाऊन सिलिंडर भरून आणावे लागले, असेही एक व्हिडीओ शेअर करताना तिने सांगितले आहे.  मला माझ्या अडचणी सांगायच्या म्हणून मी हे व्हिडीओ शेअर करत नाहीये तर अशा परिस्थितही लॉकडाउनचें पालन करत आहे यासाठी व्हिडिओ करत आहे, असेही तिने म्हटले आहे.

अगले जन्म मुझे बिटीया ही किजो, महाभारत, संतोषी माँ यांसारख्या मालिकेत रतन रजपूतने मुख्य भूमिका साकारल्या आहेत. बिग बॉस या रिअ‍ॅलिटी शो मध्ये देखील ती झळकली होती.

Web Title: coronavirus television actress ratan rajput stuck in village due to lockdown-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.