सोशल मीडियावर सेलिब्रिटी मंडळी बरीच ऍक्टिव्ह असतात. आपापल्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी, आगामी सिनेमा, त्यांचे ट्रेलर, पोस्टर याची प्रत्येक गोष्ट ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्ससह शेअर करत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट फॅन्सशी संवाद साधता येत असल्याने दिवसेंदिवस अधिकाधिक सेलिब्रिटी इथं रुळल्याचं पाहायला मिळते. 

या माध्यमातून रसिकांच्या प्रतिक्रिया थेट जाणून घेता येत असल्याने रसिक सोशल मीडियाला प्राधान्य देत आहेत. अशाच सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे प्रसिद्ध कॉमेडीयन कीकू शारदा कपिल शर्मा शोच्या माध्यमातून रसिकांना खळखळून हसवत त्यांचे मनोरंज करतो. इतकेच नाही तर अनेक सिनेमांतही त्याने साकारलेल्या भूमिकांचे विशेष कौतुक होते. किकू शारदा एका एपिसोडसाठी ५ ते ७ लाख रु. इतके मानधन घेतो. 

कीकू शारदाच्या पत्नीचे फोटोही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. प्रियंका शारदा असे तिचे नाव आहे.नुकतेच कपिल शर्मा शोमध्ये प्रियंकाने हजेरी लावली होती. तसेच यापूर्वीही नच बलिये शोमध्ये कीकू आणि प्रियंका स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. मात्र कपिल शर्मा शोमध्ये तिच्या ख-या आयुष्याविषयी रसिकांना जाणून घेण्याची संधी मिळाली.

 

त्यावरुन ती बरीच समंजस असल्याचे यावेळी दिसून आलं.सोशल नेटवर्किंग साईटवरही प्रियंका  एक्टिव्ह असते. तिने शेअर केलेल्या फोटोत ग्लॅमरस असल्याचे जाणवेल. ख-या आयुष्यात तिला स्टायलिश राहायला आवडतं.


विशेष म्हणजे कीकू शारदाची पत्नी प्रियंका मलेशियामध्ये राहत होती. दोघांचेही आई- वडिल स्थळ शोधत होते. त्यावेळी लग्नासाठी बनवलेला बायोडेटा या दोघांच्या आई- वडिलांकडे आला होता. त्यावेळी कीकू शारदालाही प्रियंकाचा फोटो पाहूनच आवडली होती.

 

दोघेही मारवाडी कुटुंबातून आहेत. दोघांचेही अरेंज मॅरेज आहे. जेव्हा पहिल्यांदा दोघे भेटले तेव्हा प्रियंकाला कीकू शारदाचे डोळे फार आवडले होते. दोघांची आवडी-निवडी जुळल्या आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.आज दोघांचाही सुखी संसार सुरु आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Comedian Kiku Sharda's wife looks so beautiful, see her glamorous photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.