सेलिब्रिटी सर्रास स्वत:चे लहानपणीचे फोटो शेअर करतात. आपल्या आवडत्या कलाकारांचे हे फोटो पाहून चाहतेही सुखावतात. त्यात आता आज चिल्ड्रन्स डे आहे म्हटल्यावर बऱ्याच कलाकारांनी आपल्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यात मराठी कलाकारांनी देखील त्यांच्या बालपणीचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्यांना ओळखणं कठीण आहे.

 

चिल्ड्रन्स डेच्या निमित्ताने कलाकारांनी त्यांच्या बालपणीचे फोटो सोशल मी़डियावर शेअर केले आहेत.

तुझ्यात जीव रंगला मालिकेत पाठक बाईंच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री अक्षया देवधर हिने इंस्टाग्रामवर तिच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे.

आपल्या दिलखेचक अदा व नृत्याने सर्वांना भुरळ पाडणारी अभिनेत्री मानसी नाईक हिनेदेखील तिच्या बालपणीचा फोटो शेअर करत बाल दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने देखील आपल्या बालपणीचे फोटो शेअर करत लहानपण देगा देवा असं कॅप्शन दिलं आहे. 

तुझ्यात जीव रंगला या मालिकेत निगेटिव्ह भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर हिनेदेखील तिच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. तिने फोटो शेअर करत म्हटलं की, Happy Children's day.... यात माझ्या लहानपणी चा पण photo आहे.

अभिनेत्री क्रांती रेडकर हिनेदेखील आपल्या बालपणीचा फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील गुरूनाथ म्हणजेच अभिनेता अभिजीत खांडकेकरने देखील बालपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो ओळखताही येत नाही.

मिसेस मुख्यमंत्री या मालिकाद्वारे अमृता धोंगडे घराघरामध्ये पोहोचली आहे. तिने देखील चिल्ड्रेन्स डे निमित्ताने तिच्या बालपणीचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

 

Web Title: Children's Day Special: See these Marathi artists, shared photos of their childhood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.