कधी काळी लाखोंची कमाई करणारा ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’चा टप्पू झाला बेरोजगार...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 11:37 AM2021-06-20T11:37:51+5:302021-06-20T11:38:42+5:30

होय, कारण कधीकाळी लाखोंची कमाई करणार टप्पू आज बेरोजगार होऊन घरात बसला आहे.

Birthday Special: Leaving ‘Tarak Mehta Ka Ooltah Chashmah’ proved to be the biggest mistake for Bhavya Gandhi | कधी काळी लाखोंची कमाई करणारा ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’चा टप्पू झाला बेरोजगार...!!

कधी काळी लाखोंची कमाई करणारा ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’चा टप्पू झाला बेरोजगार...!!

googlenewsNext
ठळक मुद्देअलीकडे भव्यच्या कोरोनामुळं निधन झाले. वडिलांच्या निधनाचा घराची जबाबदारी त्याच्या खांद्यावर येऊन पडलीये.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Tarak Mehta Ka Ooltah Chashmah) गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करतेय. या अनेक वर्षांत काही चेहरे बदलले, त्यांच्या जागी नवे चेहरे मालिकेत दिसले. हे नवीन चेहरेही आता मालिकेत रूळलेय. भव्य गांधी (Bhavya Gandhi) याने या मालिकेत टप्पूची भूमिका साकारली होती. अनेक वर्षे तो या मालिकेत होता. त्याची भूमिका इतकी लोकप्रिय झाली होती की, आजही लोक त्याला टप्पू याच नावाने हाक मारतात. पण का कुणास ठाऊक, मालिका यशाच्या शिखरावर असतानाच भव्यने ती सोडण्याचा निर्णय घेतला. आज कदाचित त्यालाही आपल्या या निर्णयाचा पश्चाताप होत असावा. होय, कारण कधीकाळी लाखोंची कमाई करणार टप्पू आज बेरोजगार होऊन घरात बसला आहे. (Bhavya Gandhi Birthday)

आज भव्य त्याचा 24 वा वाढदिवस साजरा करतोय. 20 जून 1997 रोजी जन्मलेल्या भव्यला ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेने कधी नव्हे इतकी लोकप्रियता दिली होती. ही मालिका सोडल्यानंतर भव्य काही प्रोजेक्टमध्ये दिसला. पण ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’सारखे यश त्याच्या वाट्याला आले नाही. 

गुजराती चित्रपटांच्या ऑफर मिळू लागल्याने भव्यने  ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता.  निर्मात्यांनी त्याची बरीच मनधरणी केली होती. परंतु भव्यला एकच भूमिका अनेक वर्ष साकारण्याचा कंटाळा आला होता म्हणे. याचमुळे त्याने मालिका सोडून दिली. मालिका सोडल्यानंतर भव्य एका गुजराती चित्रपटात दिसला. परंतु तो चित्रपट फ्लॉप झाला.

टीव्हीवरचा एक-दोन मालिकेत तो दिसला. पण त्याची फार कुणी दखल घेतली नाही. तेव्हापासून तो बेरोजगार म्हणूनच घरात बसला आहे. अलीकडे भव्यच्या कोरोनामुळं निधन झाले. वडिलांच्या निधनाचा घराची जबाबदारी त्याच्या खांद्यावर येऊन पडलीये. अशास्थितीत  त्याला कामाची गरज आहे. पण सध्या त्याला कामच मिळत नाहिये.

Web Title: Birthday Special: Leaving ‘Tarak Mehta Ka Ooltah Chashmah’ proved to be the biggest mistake for Bhavya Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.