Bigg boss sidharth shukla fees will shock huge amount | सलमान खाननेच नाही तर सिद्धार्थ शुक्लाने देखील 'बिग बॉस 14' घेतली मोठी रक्कम,आकडा वाचून व्हाल हैराण

सलमान खाननेच नाही तर सिद्धार्थ शुक्लाने देखील 'बिग बॉस 14' घेतली मोठी रक्कम,आकडा वाचून व्हाल हैराण

'बिग बॉस 14' सुरु होण्यासाठी अवघे काही तासाच शिल्लक आहेत. शोची चाहते आतुरतेने वाट बघतायेत. नव्या कंटेस्टेंटेसोबत जुने कंटेस्टेंटे शोमध्ये दिसणार आहेत. यात लिस्टमध्ये बिग बॉस 13 चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे नाव सामिल आहे. आता सिद्धार्थ शुक्लाची लोकप्रियता इतकी वाढली आहे की, तो ज्या शोचा भाग होतो तो हिट होतो.

सिद्धार्थ शुक्लाने घेतले किती मानधन?
याच करणामुळे सिद्धार्थ शुक्ला आता शोसाठी मोठी रक्कम आकारतो. मिळालेल्या माहितीनुसार बिग बॉसच्या मेकर्सकडून सुद्धा सिद्धार्थने जबरदस्त रक्कम घेतली आहे. सलमानची फी नेहमीच चर्चेत असते पण यावेळी सिद्धार्थची फी देखील आश्चर्यचकित करणारी आहे. आजतकच्या रिपोर्टनुसार, सिद्धार्थ शुक्लाला प्रत्येक आठवड्यासाठी 35 ते 40 लाखांचे मानधन दिले जाणार आहे. अर्थात सलमान खानच्या मानधनासमोर हे मानधन काहीच नाही. पण टीव्ही अभिनेता म्हणून सिद्धार्थला मिळालेली रक्कम हैराण करणारी आहे. 


राधे माँ सगळ्यात महागडी कंटेस्टेंट ?
सध्या राधे माँ ला मिळालेल्या मानधन सगळ्यात जास्त चर्चेत आहे. या सीझनमधील सगळ्यात महागडी कंटेस्टेंट राधे माँ असल्याचे बोलले जातंय. मिळालेल्या माहितीनुसार राधे माँ ला प्रत्येक आठवड्यासाठी 25 लाख रुपये दिले जाणार आहेत. आजतकच्या रिपोर्टनुसार, राधे माँ फक्त एका आठवड्यासाठी शो मध्ये असणार आहे. मात्र मेकर्सनी याबाबत काहीच सांगितलेले नाही. सोशल मीडियावर यावर चर्चा रंगली आहे.  
 

बिग बॉस १४ मध्ये सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या स्पर्धक ठरल्या राधे माँ, एका आठवड्यासाठी मिळणार इतके लाख रुपये

Bigg Boss 14 : पवित्रा पुनियाचा अनेक वेळा झाला प्रेमभंग, एकदा तर साखरपुडा होऊन मोडले लग्न

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bigg boss sidharth shukla fees will shock huge amount

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.