Bigg Boss OTT: बिग बॉसच्या घरात दिव्‍या अग्रवालला का झाले अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 07:30 PM2021-09-14T19:30:12+5:302021-09-14T19:30:30+5:30

ग्रॅण्‍ड फिनालेपूर्वी 'बिग बॉस ओटीटी'च्‍या 'संडे का वॉर' एपिसोडमध्‍ये खूप ड्रामा पाहायला मिळाला.

Bigg Boss OTT: Why did Divya Agarwal shed tears at the house of Bigg Boss | Bigg Boss OTT: बिग बॉसच्या घरात दिव्‍या अग्रवालला का झाले अश्रू अनावर

Bigg Boss OTT: बिग बॉसच्या घरात दिव्‍या अग्रवालला का झाले अश्रू अनावर

Next

ग्रॅण्‍ड फिनालेपूर्वी 'बिग बॉस ओटीटी'च्‍या 'संडे का वॉर' एपिसोडमध्‍ये ड्रामा, मनोरंजन, सेलिब्रेशन्‍स, भावना यांचे मिश्रण पाहायला मिळाले. प्रेक्षकांनी गणेश चतुर्थीनिमित्त स्‍पर्धकांचे अद्भुत परफॉर्मन्‍स पाहिले, तसेच त्‍यांना करण जोहर राकेशला महिलांवरील त्‍याच्‍या टिप्‍पणीसाठी फटकारताना आणि त्‍याला सेक्‍सीस्‍ट म्‍हणून हाक मारताना देखील पाहायला मिळाले.

पण, बिग बॉस ओटीटी घरामध्‍ये दिव्‍या अग्रवाल तिचा वास्‍तविक जीवनातील जोडीदार वरूण सूदला भेटली तेव्‍हा खूपच प्रेमळ क्षण पाहायला मिळाले. तो निश्चितच जोडप्‍यासाठी भावनिक क्षण होता. हे दोघेही एकमेकांना दीर्घकाळानंतर भेटले. स्‍पर्धकांसोबत गप्‍पागोष्‍टी करण्‍यासाठी घरामध्‍ये प्रवेश केलेल्‍या माजी बिग बॉस स्‍पर्धक देवोलीना भट्टाचार्य व रश्‍मी देसाई यांनी घरामध्‍ये वरूणचे स्‍वागत केले.


दिव्‍या त्‍याला पाहून खूपच आनंदित झाली आणि ती त्‍याला भेटण्‍यासाठी काचेच्‍या बॉक्‍सकडे पळाली. त्‍याक्षणी तिला अश्रू अनावर झाले आणि तिच्‍या डोळ्यांमध्‍ये आनंदाश्रू तरळले. या प्रेमळ क्षणी दोघांनी काचेच्‍या भिंतीमधून एकमेकांना किस केले. वरूणने अभिनेत्रीला आगामी आठवड्यामध्‍ये अधिक चांगली कामगिरी करण्‍यास प्रोत्‍साहित केले आणि तिला ट्रॉफी देखील जिंकण्‍याचे आवाहन केले.


आपल्‍या प्रेमिकेला भेटल्‍यानंतर वरूणने त्‍याक्षणी त्‍याच्‍या मनात निर्माण झालेल्‍या सर्व भावना एका पोस्‍टच्‍या माध्‍यमातून व्‍यक्‍त केल्‍या आहेत. त्‍या प्रेमळ भेटीचे फोटोज शेअर करत त्‍याने पोस्‍टमध्‍ये लिहिले, ''मी पॅसेजमध्‍ये बसून एका लहानशा खिडकीमधून तिची वाट पाहत होतो. मला आत जाण्‍याची संधी मिळताच मी भारावून गेलो. मला काय करावे ते समजलेच नाही. माझे हृदय जोरजोराने धडधडत होते. तिने मला पाहिले आणि तिला माहित आहे की, मला तिचा अभिमान आहे. आता फक्‍त एकच आठवडा उरला आहे. चला तर मग @divyaagarwal_official ला विजयी करूया.''

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bigg Boss OTT: Why did Divya Agarwal shed tears at the house of Bigg Boss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app