पायमोज्यांचा टॉप अन् अर्ध्या टी-शर्टचं जॅकेट! ‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद पुन्हा झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 06:02 PM2021-09-15T18:02:54+5:302021-09-15T18:03:58+5:30

होय, काही दिवसांपूर्वी एअरपोर्टवरचा उर्फीचा अवतार पाहून नेटक-यांनी तिला जबरदस्त ट्रोल केलं होतं. आता हीच उर्फी पुन्हा एकदा तिच्या कपड्यांमुळे चर्चेत आहेत.

Bigg boss ott fame urfi javed again troll for her latest dress after airport look | पायमोज्यांचा टॉप अन् अर्ध्या टी-शर्टचं जॅकेट! ‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद पुन्हा झाली ट्रोल

पायमोज्यांचा टॉप अन् अर्ध्या टी-शर्टचं जॅकेट! ‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद पुन्हा झाली ट्रोल

Next
ठळक मुद्देउर्फी जावेदने बिग बॉस ओटीटीत धमाकेदार एन्ट्री घेतली होती. मात्र 8 व्या दिवशीच ती घरातून बेदखल झाली. तेव्हापासून ती कपड्यांमुळेच चर्चेत आहे.

बिग बॉस ओटीटी’ (Bigg Boss OTT) फेम उर्फी जावेद (urfi javed ) गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. कारण आहे तिचे तडकभडक कपडे. होय, काही दिवसांपूर्वी एअरपोर्टवरचा तिचा अवतार पाहून नेटक-यांनी तिला जबरदस्त ट्रोल केलं होतं.   क्रॉप टॉप असलेल्या डेनिम जॅकेटमुळे उर्फीची ब्रा स्पष्ट दिसत होती. यामुळेच लोकांनी तिला ट्रोल केलं होतं. आता हीच उर्फी पुन्हा एकदा तिच्या कपड्यांमुळे चर्चेत आहेत. हे कपडे कसे तर पायमोजांचा क्रॉप टॉप आणि अर्ध टी-शर्टचं जॅकेट. तिची ही नवी फॅशन पाहून नेटकरीही थक्क झालेत.

या कपड्यांमधील काही फोटो उर्फीने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केलेत. यात तिने घातलेलं क्रॉप टॉप पायमोज्यांपासून बनवल्याचं आणि टी-शर्ट अर्धे कापून जॅकेट तयार केल्याचं तिनं सांगितलं.

या कपड्यांमधील तिचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि उर्फी पुन्हा एकदा नेटक-यांच्या निशाण्यावर आली. अटेंन्शनसाठी हे लोक काय काय करतात? हेच का घातलं? अशा खोचक कमेंट नेटक-यांनी केल्या. दीदी का कोई प्रॉब्लेम है, हमेशा आधे कपडे पहने आती है, अशी कमेंट करत एका युजरने उर्फीला ट्रोल केलं.
उर्फी जावेद सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे आणि रोज तिचे बोल्ड फोटो शेअर करत राहते. टीव्ही शोबद्दल बोलताना, उर्फी चंद्र नंदिनी, मेरी दुर्गा, बेपन्नाह, जिजी माँ आणि दयान सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे.  उर्फी जावेदने बिग बॉस ओटीटीत धमाकेदार एन्ट्री घेतली होती. मात्र 8 व्या दिवशीच ती घरातून बेदखल झाली. तेव्हापासून ती कपड्यांमुळेच चर्चेत आहे.

Web Title: Bigg boss ott fame urfi javed again troll for her latest dress after airport look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app