ठळक मुद्देशीव आणि वीणा गेल्या कित्येक दिवसांपासून गोव्याला जाण्याचा बेत रचत आहेत आणि आता त्यांच्या गोव्‍याला जाण्‍याच्‍या योजनांना अंतिम रूप मिळाले आहे.

प्रेमीयुगुल शीव आणि वीणा यांनी पुन्‍हा एकदा बिग बॉस घरातील आदर्श जोडी असल्याचे सिद्ध केले आहे. त्या दोघांची केमिस्ट्री या कार्यक्रमात नेहमीच प्रेक्षकांना पाहायला मिळते. टॅटू टास्‍क असो वा रिवीलेशन टास्‍क असो, या जोडीने आपल्‍या प्रेमळ संवादांसह लाखो लोकांची मने जिंकली आहेत. वीणा आणि शीव यांच्यात फुललेले हे प्रेम पुढे देखील तसेच राहील का असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. 

शीव आणि वीणा गेल्या कित्येक दिवसांपासून गोव्याला जाण्याचा बेत रचत आहेत आणि आता त्यांच्या गोव्‍याला जाण्‍याच्‍या योजनांना अंतिम रूप मिळाले आहे आणि वूटवरील 'अनसीन अनदेखा'ची नवीन क्लिप त्‍याचा पुरावा आहे!  

शीव आणि वीणा गोव्‍याला जाण्‍याच्या तारखा ठरवत आहेत आणि गणपतीनंतरचे चार दिवस योग्‍य आहेत का ते तपासत आहेत. वीणा म्‍हणते, ''चार दिवस खूप होतात तरी, मी खूप फिरलेय म्‍हणून. म्‍हणजे १५ ला जायचं आणि १८ पर्यंत परत, आपल्‍याला चार दिवस मिळतात फिरायला... ''  यावर उत्‍साहित शिव म्‍हणतो, ''तीन दिवसांतच फिरून होईल आपले... पण तिथे सगळ्यात फिरण्यासारखे काय आहे? मी कधीच गोव्‍याला गेलो नाही.'' त्‍यावर वीणा म्‍हणते, ''कधीच नाही गेला? तर चल मैं घुमाती हूँ.'' याबाबतीत शिव उत्‍सुकतेने विचारतो, ''गोव्याला सगळ्यात छान बीच कोणता आहे?'' यावर वीणा म्‍हणते, ''बीच सगळे सेम आहेत. पण त्यातही अंजुना बीच आणि कॅन्‍डोलिम बीच मला अधिक आवडतो.''  

 

वीणा प्रवासाची योजना ठरवत आहे आणि म्‍हणते, ''मग असं करू शकतो की १५ ला गोव्यात कुठेतरी फिरू... १६ ला बागा बीच आणि १७ ला पणजी... संध्‍याकाळी कॅसिनोमध्ये मजा करू...'' शिव कॅसिनोमध्‍ये रोले खेळण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त करतो आणि विचारतो की, कॅसिनो रात्रभर चालू असते का? यावर वीणा बोलते, ''हो, २४x७. तीन फ्लोअर असतात... ज्‍यात ते खालचा सकाळी बंद करतात.''  

बिग बॉस घर सोडल्‍यानंतर खरंच वीणा आणि शीव एकत्रच असणार का हे काळच ठरवेल. 


Web Title: Bigg Boss Marathi: Shiv Thakare and veena jagtap will go to Goa after bigg boss marathi 2 finale
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.