दादूस की आदिश? ‘ Bigg Boss Marathi 3’च्या घरातून आज कोण होणार बाद? चाहत्यांचं वाढलं टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 06:17 PM2021-10-24T18:17:50+5:302021-10-24T18:32:50+5:30

Bigg Boss Marathi 3 : या आठवड्याच्या नॉमिनेशन प्रक्रियेसाठी मीनल शहा, विकास पाटील, आदिश वैद्य व संतोष चौधरी उर्फ दादूस हे स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. आता या चार स्पर्धकांमधून कोणाचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपणार, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

Bigg Boss Marathi Season 3 Elimination: Santosh Chaudhary AKA Dadus or adish vaidya who To Be Eliminated From The House? | दादूस की आदिश? ‘ Bigg Boss Marathi 3’च्या घरातून आज कोण होणार बाद? चाहत्यांचं वाढलं टेन्शन

दादूस की आदिश? ‘ Bigg Boss Marathi 3’च्या घरातून आज कोण होणार बाद? चाहत्यांचं वाढलं टेन्शन

Next
ठळक मुद्देदादूस म्हणजे संतोष चौधरी. मूळ गाव भिवंडीतील कामतघर. शाळेपासूनच गायनाची आवड.

बिग बॉस मराठी’चा तिसरा सीझन ( Bigg Boss Marathi 3 ) चर्चेत आहेत. तूर्तास चर्चा आहे ती एलिमिनेशनची. होय, शनिवार, रविवार जवळ येतो, तशी बिग बॉसच्या घरातून कोणाचा पत्ता कट होणार, याची चर्चा सुरू होते. या आठवड्याच्या नॉमिनेशन प्रक्रियेसाठी मीनल शहा, विकास पाटील, आदिश वैद्य व संतोष चौधरी उर्फ दादूस हे स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. आता या चार स्पर्धकांमधून कोणाचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपणार, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
अशात संतोष चौधरी उर्फ दादूस हा ‘बिग बॉस मराठी 3’ एलिमिनेट झाल्याचा दावा केला जातोय. ‘मराठी कलाकार विश्व्’च्या इन्स्टाग्राम पेजवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यामध्ये दादूस बिग बॉसच्या  घराबाहेर गेल्याचं सांगण्यात आलं आहे.  अद्याप याबद्दल अधिकृत माहिती नाही. पण या पोस्टने दादूसच्या चाहत्यांचं टेन्शन मात्र वाढवलं आहे. आज रात्री बिग बॉस चावडीवरच कोण घराबाहेर जाणार, हे कळणार आहे.  

आदिश वैद्य मराठी टीव्ही इंडस्ट्रीमधील लोकप्रिय नाव आहेत.  ‘रात्रीस खेळ चाले’च्या पहिल्या सीझनमध्ये तो दिसला होता. याशिवाय,  कुंकू टिकली आणि टॅटू, ह्यजिंदगी नॉट आऊट  सारख्या प्रसिद्ध शोमध्ये त्याने काम केले आहे. ह्यसेक्स वेब ड्रग्स आणि थिएटर  या मराठी वेब सीरिजमध्येही तो झळकला आहे. सध्या तो ‘गुम है किसी की प्यार मे’ या हिंदी मालिकेत दिसत होता. मात्र, नुकतीच त्याने ही मालिका सोडली आहे.

दादूस म्हणजे संतोष चौधरी. मूळ गाव भिवंडीतील कामतघर. शाळेपासूनच गायनाची आवड. शाळेच्या स्नेहसंमेलनामधून गायन, निवेदन, नकला, अभिनय असे सर्व प्रकार दादूस करायचा. दादूसच्या बाबांना देवींच्या गाण्याची आवड होती. देवीच्या जागरणातून ते गाणी सादर करत. त्याला आगरी भाषेत बायाची गाणी म्हणतात. गाण्याचा वारसा दादूसला बाबांकडूनच लाभला. कोणतेही शास्त्रीय संगीताचे धडे न घेता आगरी कोळी लोकसंगीताला वेगळा आकार देण्याचा प्रयत्न केला.  बायांची गाणी, धौलगीते, कोळीगीते आदी लोकसंगीताचा बादशाह म्हणून दादूसची आज स्वतंत्र ओळख आहे. त्याचप्रमाणे दादूसचा पेहराव, डोळ्यावर काळा गॅागल, गळ्यात जाड्या सोन्याच्या चेन, पाचही बोटात अंगठ्या हा प्रसिद्ध संगीतकार बप्पी लहिरी यांच्यासारखा असल्याने मराठीतील बप्पी लहिरी म्हणूनच दादूसला ओळखलं जातं. बप्पीदा हे दादूसचे संगीतातील आदर्श आहेत. 

Web Title: Bigg Boss Marathi Season 3 Elimination: Santosh Chaudhary AKA Dadus or adish vaidya who To Be Eliminated From The House?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app