ठळक मुद्देशर्मिष्ठा राऊतने ‘मन उधाण वा-याचे,  उंच माझा झोका  या मालिकेत काम केले आहे. मात्र ‘बिग बॉस मराठी’मुळे ती लोकप्रिय झाली.

बिग बॉस मराठी’ या रिअ‍ॅलिटी शोमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत गतवर्षी ऑक्टोबरमध्ये लग्नबंधनात अडकली. आता लग्नानंतर पहिल्या सणाची नवलाई न्यारीच. शर्मिष्ठा सध्या याच नवलाईचा आनंद घेतेय. मकरसंक्रात हा नववर्षातील पहिला सण शर्मिष्ठाने आनंदात आणि उत्साहात साजरा केला.

मकरसंक्रात म्हटली की, महाराष्ट्रात स्त्रिया हळदी-कुंकू साजरे करतात. लग्नानंतरचे पहिले हळदीकुंकू खास असते. यावेळी नवविवाहिता आणि तिच्या पतीला हलव्याच्या सुंदर दागिण्यांनी सजवले जाते. शर्मिष्ठा राऊत हिचा थाटही असाच सुंदर होता. काही तासांपूर्वी शर्मिष्ठाने या नव्या नवलाईच्या हळदीकुंकवाचे फोटो शेअर केलेत. यात शर्मिष्ठा व तिचा पती तेजस दिसतोय.

शर्मिष्ठाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाची साडी नेसली आहे. त्यावर हलव्याचे सुंदर दागीने परिधान केले आहेत.  तेजसनेदेखील काळ्या रंगाचा कुर्ता आणि हलव्याचा हार घातला आहे.

काही दिवसांपूर्वी शर्मिष्ठाने तिच्या हनीमूनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ते फोटो तुफान व्हायरल झाले होते.

शर्मिष्ठा राऊतने ‘मन उधाण वा-याचे,  उंच माझा झोका  या मालिकेत काम केले आहे. मात्र ‘बिग बॉस मराठी’मुळे ती लोकप्रिय झाली. पहिल्या पर्वात  वाईल्ड कार्ड  एन्ट्री घेणा-या शर्मिष्ठा राऊतने थेट फायनलपर्यंत मजल मारली होती.
तेजस हा ‘बोस’ कंपनीत रिजनल सेल्स मॅनेजर आहे. शर्मिष्ठाने एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तिची लव्हस्टोरी सांगितली होती. ‘आमचे अरेंज मॅरेज असले, तरी हे  लव्ह मॅरेज आहे असेच मी म्हणेन. माझी बहीण सुप्रियाने आमची ओळख करुन दिली. त्याला पहिल्या भेटीतच मी आवडले होते. त्याने मला लग्नाची मागणी घातली, पण मी थोडा वेळ घेतला. काही महिन्यांनी होकार दिला. दिल तो पागल है सिनेमासारखे फिल्मी काहीसे झाले.   हाच आपला  मिस्टर राईट  आहे, असे वाटले आणि मी लग्नाला होकार दिला,’ असे तिने सांगितले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: bigg boss marathi fame Sharmishtha Raut first makar sankranti after marriage shares new photoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.