bigg boss marathi 3 : Saranghae म्हणजे काय रं भाऊ? नेटकऱ्यांनी घेतली स्रेहा वाघची मजा, मिम्स व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 11:50 AM2021-10-24T11:50:25+5:302021-10-24T11:53:54+5:30

Bigg Boss Marathi 3, Sneha wagh : तुम्हाला माहिती आहे का Saranghaeचा अर्थ

Bigg Boss Marathi 3 UPDATE Sneha wagh getting trolled because of her word saranghae | bigg boss marathi 3 : Saranghae म्हणजे काय रं भाऊ? नेटकऱ्यांनी घेतली स्रेहा वाघची मजा, मिम्स व्हायरल

bigg boss marathi 3 : Saranghae म्हणजे काय रं भाऊ? नेटकऱ्यांनी घेतली स्रेहा वाघची मजा, मिम्स व्हायरल

Next
ठळक मुद्देस्नेहाने वयाच्या 19व्या वर्षी अविष्कार दार्वेकरशी लग्न केले होते. पण त्यांचा संसार फार काळ टिकला नाही.अविष्कार आणि स्नेहाने घटस्फोट घेतला.

बिग बॉस मराठीचा तिसरा सीझन सध्या चांगलाच गाजतोय. या ना त्या कारणानं घरातील सगळेच स्पर्धक चर्चेत आहेत. सोशल मीडियावरही ‘बिग बॉस मराठी 3’ची चर्चा होतेय. सर्वाधिक चर्चा आहे ती स्रेहा वाघ हिची. होय, स्रेहा वाघने ‘बिग बॉस मराठी 3’च्या घरात एन्ट्री घेतली तेव्हापासूनच तिची चर्चा होतेय. स्रेहाची एन्ट्री झाली, तशी तिच्या दोन अयशस्वी लग्नांचा उल्लेख झाला. तिचा पहिला पती अविष्कार दारव्हेकर देखील ‘बिग बॉस मराठी 3’मध्ये सहभागी झाला म्हटल्यावर, या दोघांच्या नात्याचीही चर्चा झाली.
‘बिग बॉस मराठी 3’च्या घरात स्रेहा व अविष्कार एकमेकांसोबत कसे वागतात, पूर्वायुष्यातील अनुभवांना कसे सामोरे जातात, हे पाहण्याची उत्सुकता होतीच. पण झालं वेगळंच. ‘बिग बॉस मराठी 3’च्या घरात स्रेहा आणि जय दुधाणेची मैत्री बहरली.  पण स्नेहाचं आणि जयचं बाँडिंग वाढल्यानंतर मात्र अनेकांनी यावर नापसंती व्यक्त केली. ती ट्रोल झाली. आता काय तर नेटकरी स्रेहाची एका वेगळ्याच कारणाने मजा घेताना दिसत आहेत.

होय, स्नेहा रोज सकाळी उठल्यावर बिग बॉस घरातील कॅमे-याकडे बघून ‘सरांगे बिग बॉस... सरांगे..’ म्हणत असते. नेटिझन्सनी यावर भन्नाट मीम्स तयार केले आहेत आणि हे मीम्स प्रचंड व्हायरल होत आहेत.  
Saranghae हा कोरिअन भाषेतील शब्द आहे. याचा अर्थ ‘आय लव्ह यू’ असा होतो. पण आधी ही सरांगे नावाची भानगड काही केल्या लोकांना कळेना. पुढे पुढे या शब्दाचा अर्थ कळला. पण तोपर्यंत नेटकरी कसे शांत बसणार?  स्रेहाच्या सरांगेवरचे मीम्स व्हायरल झालेत.  

स्नेहाने वयाच्या 19व्या वर्षी अविष्कार दार्वेकरशी लग्न केले होते. पण त्यांचा संसार फार काळ टिकला नाही.अविष्कार आणि स्नेहाने घटस्फोट घेतला. त्यानंतर 2015मध्ये स्नेहाने अनुराग सोलंकीशी दुसऱ्यांदा लग्न केले. लग्नाच्या आठ महिन्यांनंतर अनुराग आणि स्नेहानाने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. 

Web Title: Bigg Boss Marathi 3 UPDATE Sneha wagh getting trolled because of her word saranghae

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app