Bigg Boss Marathi 3 Update: जय आणि गायत्रीच्या मैत्रीत पुन्हा एकदा दुरावा,जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 03:35 PM2021-11-30T15:35:13+5:302021-11-30T15:36:29+5:30

काल जयने गायत्रीला नॉमिनेशनमध्ये देखील टाकले. गायत्रीला जयचे वागणे आणि तर जयला गायत्रीचे बोलणे, वागणे, इकडच्या गोष्टी तिकडे सांगणे हे पटत नाहीये.

Bigg Boss Marathi 3 Update: Jay Dudhane And Gayatri Datar's FriendShip Ends, Know The Reason | Bigg Boss Marathi 3 Update: जय आणि गायत्रीच्या मैत्रीत पुन्हा एकदा दुरावा,जाणून घ्या कारण

Bigg Boss Marathi 3 Update: जय आणि गायत्रीच्या मैत्रीत पुन्हा एकदा दुरावा,जाणून घ्या कारण

Next

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दिवसागणिक सदस्यांमधील नाती बदलत आहेत. जे सदस्य अगदी जिवाभावाचे मित्र वा जिवाभावाच्या मैत्रिणी होत्या त्यांच्यामध्ये दुरावा येत चालला आहे. मागील आठवड्यात विशाल आणि विकास, तसेच गायत्री आणि मीरामध्ये जोरदार भांडण झाले. त्यामुळे त्यांनी एकमेकांशी बोलणे सोडले. तसेच विशाल आणि सोनालीमध्ये देखील अबोला तसाच आहे. आणि आता कालपासून कुठेतरी जय आणि गायत्रीच्या मैत्रित देखील फुट पडली आहे. असे दिसून येते आहे. काल जयने गायत्रीला नॉमिनेशनमध्ये देखील टाकले. गायत्रीला जयचे वागणे आणि तर जयला गायत्रीचे बोलणे, वागणे, इकडच्या गोष्टी तिकडे सांगणे हे पटत नाहीये. आणि त्याचबाबतीत तो आज उत्कर्ष आणि मीराशी बोलताना दिसणार आहे.

 

जय उत्कर्ष आणि मीरासोबत चर्चा करणार आहे. जयचे म्हणणे आहे, आपल्या गोष्टी तिकडे जातात किंवा आपण जी मेहनत करतो, जी इनव्हेस्टमेंट करतो ती वाया जाते ना ? मीराचं म्हणणं आहे, मागच्या वेळेस देखील तसंचं झालं होतं. जय म्हणाला, आपण मग कोणत्या वेगळ्या सदस्यामध्ये इनवेस्ट केलं असंत ना, तीच गोष्ट. आपल्याला रिजल्ट नंतर चांगला मिळाला असता. 

विशालमध्ये इनवेस्ट केलं असतं... तो स्ट्राँगली उभा राहिला असता दरगोष्टींमध्ये आपल्यासाठी. आपल्याला आज सपोर्टची गरज नाहीये, आपल्याला वोटची पण गरज नाहीये. उभं राहणं... काहीपण असून दे जेव्हा कोणी आपल्यासाठी उभं रहात ना आपली फॅमिली वाटते रे. मीराचे म्हणणे आहे, आपल्याला काही गरज नाहीये... जय पुढे म्हणाला, आज जर तू आमच्या विरुध्द तिकडे गोष्टी बोलीस. तू आमच्याकडून शिकलेली आहेस, तू तिकडे ४० लोकांसमोर काढते चूक आहे हे. मग तू ते युज करतेस. उद्या असं होईल तेदेखील तुला नाही सांगणार गोष्ट. ते पण तुला बाजूलाचं ठेवणार. ज्यावेळेस गरज आहे तेव्हा हिला वापरा...”असं होईल.

 

Web Title: Bigg Boss Marathi 3 Update: Jay Dudhane And Gayatri Datar's FriendShip Ends, Know The Reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app