Bigg Boss Marathi 3 Update: प्रसिद्ध ज्येष्ट अभिनेत्रीची घरात होणार एंट्री, स्पर्धकांनीच लावला अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 11:36 AM2021-10-20T11:36:25+5:302021-10-20T11:41:52+5:30

Bigg Boss Marathi 3: काही आठवड्यापूर्वीच आदिश वैद्यची वाइल्ड कार्ड एन्ट्री  झाली होती. आता दुसरी वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे.

Bigg Boss Marathi 3 Update: Famous senior actress's entry in the house, predicted by the contestants | Bigg Boss Marathi 3 Update: प्रसिद्ध ज्येष्ट अभिनेत्रीची घरात होणार एंट्री, स्पर्धकांनीच लावला अंदाज

Bigg Boss Marathi 3 Update: प्रसिद्ध ज्येष्ट अभिनेत्रीची घरात होणार एंट्री, स्पर्धकांनीच लावला अंदाज

Next

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल एका नव्या आणि आपल्या सगळ्यात आवडत्या - जवळच्या सदस्याची एंट्री झाली आणि ती व्यक्ति म्हणजे “आजी”. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरू आहे “चल रे भोपळ्या टुणूक टुणूक” हे कॅप्टन्सी कार्य. ज्याला नुकतीच सुरूवात झाली. ज्यामध्ये एका टीममधील सदस्य घरी परत जाणारी म्हातारी असतील आणि दुसर्‍या टीममधील सदस्य त्यांना थांबवणारे प्राणी असतील. 

प्राणी बनलेल्या सदस्यांनी भोपणे गार्डन एरियामध्ये लपवून ठेवायचे आहेत, तर म्हातारी बनलेल्या टीमने ते शोधाचे आहेत.या प्रकियेमध्ये बाद न झालेली व्यक्ति कॅप्टन पदाची उमेदवार ठरणार आहे. टीम A मध्ये जय, उत्कर्ष, गायत्री, स्नेहा, संतोष आणि विकास. टीम B मध्येविशाल, आदिश, सोनाली, मीनल, आविष्कार आणि मीनल. टीम B मधील सदस्यांमध्ये मीरा ठरली कॅप्टन पदाची पहिली उमेदवार. 


 
आजींनी सदस्यांना सांगितले, मी सांगितल्याप्रमाणे जो जिंकेल त्याला खाऊ आणि जो हरेल त्याला शिक्षा देणार. त्यामुळे कॅप्टन पदाच्या उमेदवारीसाठी आजींनी दिले बेसनाचे लाडू. हे कार्य चातुर्य आणि चपळाईने पूर्ण करायचे होते, ते सदस्यांना जमले नाही त्यामुळे जे उमेदवार झाले नाहीत त्यांची चपळाई वाढावी म्हणून त्यांनी २५ उठाबशा काढायाला आजींनी सांगितले.


 

आजीच्या एंट्रीनंतर घरात वेगळेच वातावरण पाहायला मिळत आहे. मुळात आजीचा आवाजही ही ज्येष्ट अभिनेत्री नयना आपटे यांच्या आवाजाशी मिळता जुळत आहे. त्यामुळे आता वाईल्ड कार्ड स्पर्धक एंट्री होणार ती नयना आपटे यांची असा स्पर्धकांचा अंदाज आहे. काही आठवड्यापूर्वीच आदिश वैद्यची वाइल्ड कार्ड एन्ट्री  झाली होती. आता दुसरी वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरामधून स्पर्धक सुरेखा कुडचीला घराबाहेर जावे लागले. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आता पुन्हा नवीन टास्क रंगणार आहेत. तसेच नयना आपटे घरात एंट्री करणार म्हटल्यावर आणखीन रंजक हा शो होणार हे मात्र नक्की. इतर स्पर्धकांसह त्यांची तगडी टक्कर पाहायला मिळणार आहे. 

Web Title: Bigg Boss Marathi 3 Update: Famous senior actress's entry in the house, predicted by the contestants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app