Bigg Boss Marathi 3: '...मग मी वाट लावेन', मीराचे वाद काही संपता संपेना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 04:53 PM2021-09-24T16:53:33+5:302021-09-24T16:54:12+5:30

मीरा पहिल्या दिवसापासूनच काहीना काही मुद्द्यांमुळे चर्चेत येत आहे.

Bigg Boss Marathi 3: '... then I will take revenge', Mira's argument never ends | Bigg Boss Marathi 3: '...मग मी वाट लावेन', मीराचे वाद काही संपता संपेना

Bigg Boss Marathi 3: '...मग मी वाट लावेन', मीराचे वाद काही संपता संपेना

Next

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये १५ वेगवेगळ्या स्वभावाचे लोक एकत्र राहत आहेत म्हणजे वादविवाद होणारच, खटके उडणारच. तसेच काहीसे यावेळी घरात पहायला मिळत आहे. मीरा पहिल्या दिवसापासूनच काहीना काही मुद्द्यांमुळे चर्चेत येत आहे. मग कधी ते स्नेहा वाघ सोबत असो तर कधी जयसोबत असो.

आज मीरा आणि आविष्कारमध्ये वादाची ठिणगी पडणार आहे. मीराला आविष्कार सांगायचा प्रयत्न करतो आहे की “बाकीच्या सदस्यांनी जसे आवरून ठेवले आहे तसे तरी किमान ठेवावे”, तसे करण्यास मीराने साफ नकार दिला आणि हे आतापासून नाही पहिल्या दिवसापासून तसेच आहे असे ती म्हणाली. त्यावरून वाद पुढे वाढला. आविष्कार म्हणाला, “पहिल्या दिवसाचे मला सांगू नकोस, प्रत्येक जण स्वत:चे काम करतो आहे बाकी साफ सफाई करणे माझे काम आहे. तुला मुद्दाम टाकायचे असेल तर मी बघतो काय करायचे. मीराचे त्यावर म्हणणे आहे, “मी तुम्हांला एकच काम सांगते आहे, तुम्हाला करायचे असेल तर करा, नसेल जमणार तर तुम्ही मला नाही म्हणून सांगा. मी तशी तक्रार करेन. मी आता करणारच आहे तक्रार.

मीरा पुढे म्हणाली, “पहिल्या दिवसापासून हे मला त्रास देत आहेत. रोज सकाळी हेच. त्यांनी कालपासून ठरवले आहे की ते मला नडणार आहेत. जरा मी नडायला गेले ना यांची तर मग मी वाट लावेन. मी शांत आहे कारण ते दोन - दोन काम करत आहेत. दुसर्‍या दिवशी सांगितले होते पहिले बेडरूम करायची आणि मग किचन. मग का नाही ऐकत , मी नाही ना अडून बसले त्यावर”. आता मीरा आणि आविष्कार मधला वाद सुरूच राहिला की ती इथेच थांबला. हे कळेल आजच्या भागामध्ये. 

Web Title: Bigg Boss Marathi 3: '... then I will take revenge', Mira's argument never ends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app