जय, उत्कर्ष, मीरा, गायत्रीला बाहेर काढा...; भडकले ‘Bigg Boss Marathi 3’चे चाहते

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 02:28 PM2021-10-21T14:28:23+5:302021-10-21T14:30:27+5:30

Bigg Boss Marathi 3 : ‘बिग बॉस मराठी 3’ मध्ये सध्या टास्कदरम्यान प्रचंड राडा पाहायला मिळतोय. सोशल मीडियावर यावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या.

bigg boss marathi 3 netizens slam jay dudhane utkarsh shinde and mira jagganath in marathi | जय, उत्कर्ष, मीरा, गायत्रीला बाहेर काढा...; भडकले ‘Bigg Boss Marathi 3’चे चाहते

जय, उत्कर्ष, मीरा, गायत्रीला बाहेर काढा...; भडकले ‘Bigg Boss Marathi 3’चे चाहते

Next
ठळक मुद्देजय , उत्कर्ष, मीरा व गायत्री यांची फालतूगिरी बघून बघून आता आम्हाला कंटाळा आलाय त्यांना घराबाहेर काढा, अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली.

बिग बॉस मराठी 3’ मध्ये (Bigg Boss Marathi 3) सध्या टास्कदरम्यान प्रचंड राडा पाहायला मिळतोय. घरात अलीकडे ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’ हे कॅप्टन्सी कार्य पार पडलं. आदिश आणि मीरा जगन्नाथ या दोघांमध्ये कॅप्टनसीचा सामना रंगला आणि मीरा अगदी सहज जिंकली. कारण काय तर अख्खी टीम जणू फक्त मीरासाठीच खेळली. होय, किमान नेटक-यांना तरी हेच वाटलं. सोशल मीडियावर यावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. मग काय, मीरा, जय आणि उत्कर्ष सगळेच ट्रोल झालेत.
या टास्कमध्ये प्रचंड धक्काबुक्की झाली. नियम धाब्यावर बसवले गेलेत. यामुळे बिग बॉसनी अगदी कडक शब्दांत सदस्यांची कानउघडणी केली. जय, उत्कर्ष, विकास, आदिश यांना सक्त ताकीद दिली. शिवाय विशालने बिग बॉसच्या घरातील प्रॉपर्टीचं नुकसान केलं म्हणून त्याला थेट पुढील आठवड्याच्या घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट केलं. या संपूर्ण एपिसोडवर नेटक-यांच्या प्रतिक्रिया उमटल्या. 

‘काय चाललंय नक्की? एकीकडे तुम्ही नियम सांगता की भोपळा लपवायचा आहे आणि जय-उत्कर्ष भोपळा लपवत नाहीत. मीराला अडवतसुद्धा नाहीत. मीराला कॅप्टन टास्कमधून बाद करा. अशा गोष्टींमुळेच लोक बिग बॉस बघणं सोडून देत आहेत’, अशी कमेंट एका चाहत्याने केली. हे सर्व जय मुळे झाले नुसता माजलेल्या वळूसारखा अंगावर घाऊन येतो, अशी कमेंट एका चाहत्याने केली.
एका चाहत्याने जयला फैलावर घेतलं. ‘हा नेहमीच उभा फाडून ठेवण्याची धमकी देत असतो. तुम्हाला हे चुकीचं वाटत नाही का?’, असा सवाल करत या चाहत्याने महेश मांजरेकर यांना टॅग केलं.
जय , उत्कर्ष, मीरा व गायत्री यांची फालतूगिरी बघून बघून आता आम्हाला कंटाळा आलाय त्यांना घराबाहेर काढा, अशी प्रतिक्रिया अन्य एका चाहत्याने दिली.

Web Title: bigg boss marathi 3 netizens slam jay dudhane utkarsh shinde and mira jagganath in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app