Bigg Boss Marathi 3: मास्टरमाइंड विकास पाटील आखतोय टीम B सोबत रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 01:36 PM2021-10-20T13:36:01+5:302021-10-20T13:37:44+5:30

Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घरात कालपासून सुरू आहे चल रे भोपळ्या टुणूक टुणूक.

Bigg Boss Marathi 3: Mastermind Vikas Patil devises strategy with Team B. | Bigg Boss Marathi 3: मास्टरमाइंड विकास पाटील आखतोय टीम B सोबत रणनीती

Bigg Boss Marathi 3: मास्टरमाइंड विकास पाटील आखतोय टीम B सोबत रणनीती

Next

बिग बॉस मराठीच्या घरात कालपासून सुरू आहे “चल रे भोपळ्या टुणूक टुणूक” हे कॅप्टन्सी कार्य. काल टीम A पुर्णपणे जणू मीरासाठीच खेळत होती की काय असा प्रश्न प्रेक्षकांना देखील पडला असेलच. मीनलची कॅप्टन बनण्याची इच्छा अपूर्ण राहिली कारण, उमेदवारीमधून ती बाहेर पडली. आदिश आणि मीरामध्ये काल उमेदवारीचा सामना रंगला ज्यामध्ये अगदीच सहजरित्या मीरा जिंकली आणि ती ठरली कॅप्टन पदाची पहिली उमेदवार. आज टीम A म्हातारी बनणार असून Team B म्हणजेच विशाल, सोनाली प्राणी बनणार आहेत म्हणजेच या टीमला भोपळे लपवायचे आहेत आणि विकास टीम A मध्ये असल्याने तो टीम B सोबत कार्याची रणनीती आखताना दिसणार आहे, कारण कुठेतरी त्याला देखील कॅप्टन होण्याची इच्छा आहे.

विकासचे म्हणणे आहे, दुसर्‍या राऊंडला आजीचे गाठोडे आहे ना ते उघडायचे आणि त्याच्यामध्ये भोपळा ठेवायचा, काल आम्ही पहिले ते उघडून... भोपळा ठेवला की, परत गाठोड आहे तिथे ठेवायचे. मी येणार डायरेक्ट गाठोड घेऊनच आत येणार. तिघांना बाहेर काढायचे आहे. विशाल तुझं पहिलं काम जिथे जयचा टाकशील तिथे उत्कर्षचा टाकशील आणि तिथेच दादूसचा पण टाकशील. आपल्याला हे तीन लोक बाहेर काढायची आहेत. हे तीन एकदा बाहेर गेले की मग ... पुढे मग खेळवा तुम्ही सगळ्यांना. कारणं तेव्हा फक्त मुली रहातील. काल जे ते करत होते ना, आपल्याला तितके नाही करायचे पण... आणि पुढे अजून काही योजना आखल्या गेल्या. कोण बाजी मारते ते आजच्या भागामध्ये कळेल.
 

Web Title: Bigg Boss Marathi 3: Mastermind Vikas Patil devises strategy with Team B.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app